राज्य सरकारमधील विद्यमान मंत्री संजय राठोड आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्याती संघर्ष संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. आज पत्रकारपरिषदेत बोलताना चित्रा वाघ यांना संजय राठोड यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा जाहीर केली.

चित्रा वाघ म्हणाल्या, “ज्यावेळी रस्त्यावरील लढाईची गरज होती. त्यावेळी संजय राठोडांच्या विरोधात मी लढले. आता न्यायालयात मी गेली आहे. न्यायालयात खटला दाखल केलेला आहे. यामध्ये लपवण्यासारखं काही नाही, ते तुम्ही कधीही तपासू शकता. दुसरी गोष्ट त्यांना मंत्री करत असताना माझी जी भूमिका आहे, ती मी मांडलेली आहे. माझी लढाई संपलेली नाही, हे तेव्हाही बोलले मी आणि आजही बोलते आहे. तिसरी गोष्ट यामध्ये मंत्रीपद यासाठी दिलं, कारण त्यांना क्लिनचीट दिली आहे. आता क्लीनचिट कोणी दिली? आमचं सरकार तर आता आलं आहे.”

sada sarvankar marathi news (1)
“उद्धव ठाकरेंसारखा माणूस राजकारणात सापडणार नाही”, सदा सरवणकरांच्या नावाने पोस्ट व्हायरल; स्वत: स्पष्टीकरण देत म्हणाले…
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
nagpur district thackeray shiv sena chief devendra godbole resigned from his post
ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा राजीनामा
sharad pawar ajit pawar (4)
“जी व्यक्ती जाऊन ९ वर्षं झाली…”, शरद पवारांची आर. आर. पाटलांबाबत अजित पवारांनी केलेल्या विधानावर नाराजी!
Ajit Pawar Baramati Vidhansabha
Ajit Pawar Baramati : “बारामतीत लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं मतदारांनी ठरवलं होतं”, अजित पवारांचं विधान चर्चेत!
Anil Deshmukh
मनसुख हिरेनच्या हत्येची कल्पना फडणवीसांना होती! अनिल देशमुख यांचे प्रत्युत्तर
Union Home Minister Vigilance Medal to Police Inspector Ankush Chintaman
अंकुश चिंतामण, हेमंत पाटील यांना, केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक
raj thackeray on amit thackeray
अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणाऱ्या शिंदे गट व ठाकरे गटाला राज ठाकरे म्हणाले…

याचबरोबर, “हे तुम्ही जे मला प्रश्न विचारत आहात, याचं उत्तर तुम्ही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारलं पाहिजे. त्यावेळचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारलं पाहिजे. पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता जे आजही सेवेमध्ये आहेत त्यांना विचारलं पाहिजे, की बाबानों तुम्ही तिघांनी काय म्हणून या संजय राठोडला क्लीनचिट दिली? तुम्ही क्लिनचीट दिली म्हणून या सरकारने त्यांना मंत्री बनवलं. तरीही माझा विरोध कायम आहे.” असंही चित्रा वाघ यांनी यावेळी म्हटलं.

याशिवाय, “ज्यावेळी रस्त्यावरील लढाई लढायची होती त्यावेळी लढले. आता न्यायालयीन प्रकरण आहे आणि माझा न्यायालयावर विश्वास आहे. मी असं म्हणणाऱ्यामधील नाही की माझ्या बाजूने निकाल दिला तर माझा न्यायालयावर विश्वास आहे आणि नाही दिला तर हे पण सरकारच्या दावणीला बांधलं का? असं म्हणणाऱ्यामधील मी नाही. माझा पूर्ण विश्वास आहे की यामध्ये मला न्याय मिळेल आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. मी खरं बोलते की खोटं हे तुम्ही तपासू शकता आणि त्यावर तुम्ही मला शंभर प्रश्न विचारू शकतात.” असंही चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं.

हा संघर्ष सुरूच राहील –

संजय राठोड यांना निर्दोषत्व (क्लीनचिट) देण्यात महाविकास आघाडी सरकारच कारणीभूत असून आताही या प्रवृर्त्तीविरूध्द माझा लढा सुरूच राहणार असल्याचे भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी या अगोदर सांगलीत पत्रकारपरिषदेत सांगितले होते.

“महाविकास आघाडी सरकारच्या काळातही आपण राठोड यांच्यावर कारवाईसाठी आग्रह केला, आजही करत असून उद्याही हा संघर्ष सुरूच राहील. पिडीत मुलीला न्याय मिळावा यासाठी आपणच पुढाकार घेउन जनहित याचिका न्यायालयात दाखल केली आहे. राठोड यांना निर्दोष ठरविण्यासाठी तत्कालिन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पोलीस अधिकारी अभिताभ गुप्ता यांचीही यामध्ये न्यायालयात बाजू स्पष्ट होईलच. ” असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.