एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी २१ जून रोजी सर्वांत मोठं बंड केलं. या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. एवढंच नव्हे तर सत्तेवर असलेलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. संख्याबळ कमी झाल्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. यासह राज्यात बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेनेचे निष्ठांवत, ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे अनेकजण शिंदेंच्या गटात सामील झाले. त्यापैकीच एक आमदार म्हणजे हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर.

शिंदेंना घातली होती साद

एकनाथ शिंदेंनी बंड पुकारले म्हणून संतोष बांगर भरसभेत हमसून हमसून रडले. शिंदेंसह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना हात जोडून कळकळीची विनंती करत परत येण्याचं आवाहन बांगरांनी केलं. “उद्धव ठाकरे तुम्हाला माफ करतील, तुम्ही परत या”, असं आवाहन करून त्यांनी शिंदेंना साद घालण्याचा प्रयत्न केला. त्यांची साद शिंदेंपर्यंत पोहोचली नाही, त्यामुळे त्यांनी शिंदे गटातील आमदारांच्या बायका-मुलांना थेट लक्ष्य केलं. दरम्यान, ठाकरेंनी राजीनामा दिल्याने शिंदे आणि भाजपाला सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. एका संध्याकाळी अचानक मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या दोघांनी पदाची शपथ घेतल्यानंतर दोन दिवसीय विशेष अधिवेशन घेण्यात आले होते. या दोन दिवसीय विशेष अधिवेशनातील पहिल्या दिवशी संतोष बांगर ठाकरे गटात होते, परंतु, दुसऱ्या दिवशी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी नेमकं काय घडलं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?

बंडखोरांविरोधात संतोष बांगरांनी काढला होता मोर्चा

२१ जून २०२२ ची सकाळ उजाडली ती एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या बातमीने. नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे त्यांच्या काही समर्थक आमदारांसह सुरतला पोहोचले होते. यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला होता. सर्वांत मोठा धक्का उद्धव ठाकरेंसाठी होता. कारण, १९ जून २०२२ रोजी झालेल्या वर्धापन दिनाच्या अगदी दुसऱ्याच मध्यरात्री शिंदेंनी बंड पुकारल्याने उद्धव ठाकरे कमालीचे अस्वस्थ झाले. एकनाथ शिंदेंनी मराठवाड्यातील नऊ आमदारांसह बंड केल्याने हिंगोलीचे आमदार संतोष बांगरांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर ते हिंगोलीत परत आले. २४ जून २०२२ रोजी हिंगोलीमध्ये तत्कालीन शिवसेनेच्यावतीने (ठाकरे गट) बंडखोरांविरोधात मोठा मोर्चा काढला. बांगरांनी बंडखोरांविरोधात भूमिका घेतल्याने त्यांची मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना संतोष बांगर जनसमुदायासमोरच रडले. “हात जोडून सर्व आमदारांना कळकळीची विनंती करतो की तुम्ही गद्दारी केली म्हणून उद्धव ठाकरे तुमच्यावर रागवणार नाहीत. तुम्ही पुन्हा एकदा परत या. उद्धव ठाकरे तुम्हाला माफ करतील”, असं संतोष बांगर यांनी भरल्या डोळ्यांनी सांगितलं होतं. “एकनाथ शिंदे शिवेसनेचे गटनेते आहेत. त्यांनाही विनंती आहे की एका ठिकाणी बसा आणि निर्णय घ्या. आम्ही १०० टक्के तुमच्यासोबत आहोत. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांच्या करकरीत भगव्याला डाग न लावता माझी आपल्या सर्वांना विनंती आहे”, असं संतोष बांगर म्हणाले होते.

त्यानंतर, २६ जून २०२२ रोजी पुन्हा एका सभेत बांगरांनी बंडखोरांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “ज्या पक्षाने तुम्हाला आमदार केलं, त्या पक्षाला तुम्ही सोडून गेलात. यांना तुमच्या बायकासुद्धा सोडून जातील. त्यांची मुलंसुद्धा मुंजे (अविवाहित) मरतील”, असं वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी ठाकरेंचे समर्थन स्पष्ट केलं होतं.

विशेष अधिवेशनात नेमकं काय घडलं?

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची सत्ता स्थापन झाल्यानंतर ३ आणि ४ जुलै २०२२ रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी रिक्त असलेल्या विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. यावेळी भाजपाचे राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर, दुसऱ्या दिवशी विश्वासदर्शक ठरावास सरकार सामोरे गेले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संतोष बांगर ठाकरे गटात होते. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी त्यांनी ठाकरेंचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान केले होते. परंतु, दुसरा दिवस महत्त्वाचा होता. या दिवशी शिंदे गटाला बहुमत चाचणी आणि विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार होते. बहुमताचा आकडा गाठण्याकरता शिंदे गटाकडून हालचाली सुरू होत्या. तेवढ्यातच, ठाकरेंचे निष्ठावान शिवसैनिक मानले जाणारे संतोष बांगर शिंदे गटात सामील झाले.

शिवसेनेतील बंडाळीनंतर संतोष बांगरही शिंदे गटात सहभागी होत असल्याचे वृत्त दोनदा बाहेर आले. पण दोन्ही वेळेस आपण ‘मातोश्री’वरच आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच आपले नेते आहेत असे ते वारंवार सांगत राहिले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्येही त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारास मतदान केले. मात्र, रात्रीतून चक्रे फिरली आणि बांगर नव्या सरकारच्या गोटात सहभागी झाले.

हेही वाचा >> निष्ठावान म्हणून मिरवून घेतल्यानंतर संतोष बांगरही शिंदे गटात

“एकनाथ शिंदेंकडे ठाकरे गटापेक्षा जास्त आमदार आहेत. भरत गोगावलेंचा व्हिप ग्राह्य धरला गेला आहे. तर आदित्य ठाकरेंसह अनेक आमदारांची आमदारकी धोक्यात आली असल्याने आमदारकी वाचवण्याकरता संतोष बांगरांनी एकनाथ शिंदेंना समर्थन दिलं”, असं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने समोर आलं होतं. याविषयी संतोष बांगरांना विचारले तेव्हा, ‘नो कॉमेट्स’ अशा दोनच शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली होती.

संतोष बांगर शिंदे गटात कसे आले? खुद्द एकनाथ शिंदेंनीच सांगितली इनसाईड स्टोरी

एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशनात संतोष बांगरांविषयी सांगितले होते. त्यावेळी ते म्हणाले की, “संतोष बांगर यांना मी बोलवलं नाही. त्यांनी मला फोन केला होता. मला कसं बोलावं म्हणून ते घाबरत होते. पण त्यांनी रात्री दीड वाजता फोन केला. मला यायचं आहे, माझी चूक झाली आहे. आणखी तीन ते चार लोक आहेत, त्यांचंही मत असंच आहे, असं बांगर यांनी मला सांगितलं. नंतर मी बांगर यांना सांगितलं की, आपल्याला खोटं काहीही करायचं नाही,” असे एकनाथ शिंदे आपल्या भाषणादरम्यान म्हणाले.

Story img Loader