Baba Siddique Shot Dead Breaking News : राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वांद्रे येथील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भररस्त्यात त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारातील दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून तिसऱ्या आरोपीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांचे १५ पथक तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, या संशयित आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या संशयित आरोपींकडून दोन पिस्तुल आणि २८ राऊंड जप्त करण्यात आले असून त्यांच्याकडे पेपर स्प्रेही होता. हिंदूस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

गुन्हे शाखेचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी रविवारी सांगितले की, पोलिसांनी आरोपींकडून दोन पिस्तूल आणि २८ जिवंत राऊंड जप्त केले आहेत. या हत्येमध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या कथित सहभागाची चौकशी चालू आहे. बाबा सिद्दीकी यांना वर्गीकृत सुरक्षा नव्हती पण त्यांना मुंबई पोलिसांकडून ३ सुरक्षा कर्मचारी देण्यात आले होते. घटनेच्या वेळी आमचा एक सुरक्षा कर्मचारी त्यांच्यासोबत होता. आम्ही सलमान खानसह या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करत आहोत. लॉरेन्स बिश्नोईचे संदर्भही तपासले जात आहेत”, असंही ते म्हणाले.

baba siddiqui cremated with state honors
Baba Siddiqui Murder : बाबा सिद्दीकींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, बॉलिवूड कलाकारांसह राजकारण्यांनी दिला अखेरचा निरोप!
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
Ratan Tata Brother at His Funeral
Ratan Tata : रतन टाटांना अखेरचा निरोप देताना भाऊ जिमी टाटांना अश्रू अनावर, सावलीसारखा भाऊ हरपल्याचं मनात दुःख
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : “…कारण महापुरुष कधीच मरत नाहीत”, रतन टाटांच्या निधनानंतर आनंद महिंद्रांची पोस्ट
Rashmi Joshi, cancer, support, Rashmi Joshi news,
रश्मी जोशी… कॅन्सरग्रस्तांसाठी आधारवड!
Salil Ankola Former Indian Cricketer Mother Found Dead in Pune Flat Wound Marks Found on Neck
Salil Ankola: माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा संशयास्पद मृत्यू, गळ्यांवर जखमांच्या खूणा
sonam wangchuk s indefinite hunger strike
सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण
ramdas kadam on sanjay shirsat
“उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण केलं”, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच… ”

हेही वाचा >> Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट तुरुंगात रचला! रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या आणि.. आत्तापर्यंत काय काय घडलं?

“घटनेच्या ठिकाणी तीन जण होते. दोघांना पकडण्यात आले आहे आणि एक फरार आहे. तिसऱ्याला शोधण्यासाठी गुन्हे शाखेचे १५ पथक तैनात आहेत”, असं पोलिसांनी सांगितलं. पोलीस पुढे म्हणाले, त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हल्ल्यासाठी पेपर स्प्रे आणला होता. परंतु तिसरा आरोपी शिवकुमार गौतम याने गोळीबार सुरू केल्यामुळे ते पेपर स्प्रे वापरू शकले नाहीत.

पेपर स्प्रे का आणला होता?

“मुंबई क्राईम ब्रँचने दोन्ही आरोपींकडून दोन पिस्तुले जप्त केली. हल्लेखोरांनी पेपर स्प्रे आणला होता, आधी हल्लेखोर पेपर स्प्रे फवारणार होते आणि नंतर गोळीबार करणार होते पण तिसरा आरोपी शिवकुमार गौतम याने थेट गोळीबार सुरू केला. बाबा सिद्दीकी यांच्यासोबत तीन कॉन्स्टेबल होते. पण ते काही करू शकले नाहीत, या गोळीबारात आणखी एक जण जखमी झाला आहे”, अशीही माहिती पोलिसांनी दिली.

भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०३(१), १०९, १२५, आणि ३(५) अन्वये निर्मल नगर पोलीस ठाण्यामध्ये शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३, २५, ५ आणि २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.