पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर होते. पंतप्रधान मोदींना मंगळवारी (१ ऑगस्ट) ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पक्ष फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार पहिल्यांदाच सार्वजानिक कार्यक्रमात एकाच मंचावर दिसले. दोन्ही नेते जवळपास ७५ मिनिटं या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी अजित पवार वगळता सर्वच नेत्यांनी शरद पवारांशी हातमिळवणी करत संवाद साधला. मात्र, अजित पवारांनी नजरेला नजरही भिडवली नाही. शिवाय हा पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार गुपचूपणे शरद पवारांच्या पाठीमागून निघून गेले.

हेही वाचा- “…याचा मक्ता त्यांना कोणी दिला?” अजित पवारांनी राज ठाकरेंना खडसावलं

व्यासपीठावर घडलेल्या या घटनाक्रमानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, शरद पवारांच्या पाठीमागून गुपचूप निघून का गेलो? याचं उत्तर स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं आहे. शरद पवारांचा आदर करतो, त्यामुळे भीतीपोटी मी पाठीमागून निघून गेलो, असं उत्तर अजित पवारांनी दिलं. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- “शरद पवारांची भूमिका…”, पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यावरून काँग्रेस नेत्याचं मोठं विधान

व्यासपीठावर हातमिळवणी न करण्याच्या प्रसंगाबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, “मी शरद पवारसाहेबांचा आदर करतो, त्यामुळे पाठीमागून गेलो. आपण आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर करताना, भीतीने पाठीमागून जातो. त्याप्रमाणे मीही गेलो. त्यांचा आदर करतो म्हणूनच मी पाठीमागून गेलो.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why dont meet sharad pawar on stage ajit pawar give answer pm narendra modi gets lokmanya tilak national award rmm