राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अलीकडेच राज्याचं विरोधी पक्षनेतेपद सोडण्याची भाषा केली. मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा. मला पक्ष संघटनेतील कोणतंही पद द्या, अशी विनंती अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवारांकडे सध्या मुख्यमंत्री पदानंतर सर्वात महत्त्वाचं विरोधी पक्षनेतेपद आहे. असं असताना त्यांना हे पद का नको आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर आता स्वत: अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. मागील ३२ वर्षात मी आमदार-खासदारकीसह अनेक पदं भूषवली. आता पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली, तर त्यात वाईट काय आहे? असं प्रतिप्रश्न अजित पवारांनी विचारला. ते बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- “छगन भुजबळांचं बरोबरच आहे”, प्रदेशाध्यक्षपदाबाबत केलेल्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया

तुमच्याकडे प्रचंड ताकदीचं राज्यातील विरोधी पक्षनेतेपद आहे, असं असताना तुम्हाला हे पद का नको आहे? असं विचारलं असता अजित पवार म्हणाले, “अरे बाबा, मी मागील ३२ वर्षात राज्यमंत्रीपद, आमदारकी, खासदारकी, कॅबिनेट मंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद आणि उपमुख्यमंत्रीपद अशी सगळी पदं भुषवली आहेत. एवढी सगळी पदं भूषवल्यानंतर मी संघटनेचंही काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली, यात वाईट काय आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

हेही वाचा- प्रदेशाध्यक्ष पदावरून राष्ट्रवादीत रस्सीखेच? अजित पवारांनंतर भुजबळांचं मोठं विधान, म्हणाले, “मला जबाबदारी…”

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

‘‘विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची आपली अजिबात इच्छा नव्हती. पण, आमदारांचा आग्रह आणि त्यांनी स्वाक्षऱ्या गोळा केल्याने ते पद स्वीकारले आणि गेले वर्षभर काम केले. पण काही नेत्यांचं म्हणणं आहे की, मी कठोर वागत नाही. मग मी सत्ताधारी नेत्यांचं कॉलर पकडायला हवी का? पण आता हे पुरे झाले, मला पक्ष संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या’’, असं अजित पवार म्हणाले. या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ आदी नेते उपस्थित होते

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why dont want leader of the opposition post ajit pawar gave reaction rmm