सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून फक्त विरोधी पक्षातील नेत्यांची चौकशी केली जाते, असा आरोपी विरोधी पक्षातील नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. गेल्या काही वर्षांत ईडीने एकाही भाजपाच्या नेत्यावर कारवाई केल्याच माहितीत नाही. यावरून प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी थेट भाजपाला सवाल विचारला आहे. भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून का चौकशी केली जात नाही? याचं उत्तर भाजपाने द्यायला हवं, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं. ते ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठा आरक्षणावरून राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर प्रतिक्रिया देताना प्रसारमाध्यमांना उद्देशून बच्चू कडू म्हणाले, “समाजाला हुशार करण्याची जबाबदारी राजकीय नेत्यांची असते. पण राजकीय नेते चुकले तर तुम्ही (प्रसारमाध्यमांनी) ताळ्यावर आणलं पाहिजे. जे काही सत्य आहे, ते तुम्ही मांडलं पाहिजे. यामुळे राजकीय नेते रुसले तर तुमचं काहीच बरं-वाईट होत नाही. तुमच्यामागे ईडीची चौकशीही लागू शकत नाही. ईडी लागणार नाही, अशाप्रकारे काम करत राहा.”

हेही वाचा- एकनाथ खडसेंना हृदयविकाराची समस्या, प्रकृतीबाबतची महत्त्वाची अपडेट समोर

तुम्हाला असं वाटतं का की, जे लोक खरं बोलतात, त्यांच्यामागे ईडी लावली जाते? असा प्रश्न विचारला असता बच्चू कडू पुढे म्हणाले की, मी तर आता भाजपाबरोबर आहे. पण भाजपावाल्यांना माझा प्रश्न आहे. माझा सरळ प्रश्न आहे. ईडीने भाजपाच्या एकाही नेत्याची चौकशी का केली नाही? त्यांनी याचं उत्तर द्यायला हवं. एका सामान्य कार्यकर्त्यालाही हा प्रश्न पडतो. ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) किंवा काँग्रेसच्या नेत्यांची चौकशी केली जाते. पण भाजपाच्या एकाही नेत्याची चौकशी होत नाही. शिंदे गटाच्या नेत्यांमागे ईडीची चौकशी सुरू होती, पण ते आता सत्तेत आले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why ed does not investigate bjp leader bachchu kadu statement rmm
Show comments