नृत्यांगना गौतमी पाटीलने सोमवारी भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे. गौतमी पाटीलने असं अचानक भेट घेतल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. उदयनराजेंना भेटायला जाताना गौतमी पाटीलने त्यांच्यासाठी खास भेट आणली होती. तिने एका सहकाऱ्याच्या सल्ल्यावरून उदयनराजेंना त्यांचा आवडता परफ्यूम भेट दिला आहे.
सोशल मीडियावरील या चर्चेनंतर उदयनराजे भोसले यांनी गौतमी पाटील का भेटायला आली होती? याचं उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला शाब्दिक चिमटा काढला आहे. ते सातारा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी एका पत्रकाराने विचारलं की, तुम्हाला गौतमी पाटील भेटायला का आली होती? यावर उदयनराजेंनी हसत उत्तर दिलं. ते पत्रकाराला उद्देशून म्हणाले, ” तुमच्या चेहऱ्यावर स्माईल का आहे?” उदयनराजेंच्या या उत्तरानंतर एकच हशा पिकला.
हेही वाचा- “रात्री पाटीलबाईला बोलवायचं का?” बारामतीत अजित पवारांची गौतमी पाटीलवर मिश्किल टिप्पणी!
उदयनराजे पुढे म्हणाले, “गौतमी पाटील ह्या एक कलाकार आहेत. जो कलेची दाद देतो, त्यांच्याकडेच त्या (गौतमी पाटील) जाणार ना… कलेची जाण नसणाऱ्या व्यक्तीकडे त्या का जातील? आगामी चित्रपट आणि इतर प्रकल्पासाठी माझ्याकडून त्यांना काहीतरी सहकार्य मिळेल, म्हणून त्या आल्या असतील. यासाठी त्यांना शुभेच्छा देणं आपलं कामच आहे.”
हेही वाचा- कपडे बदलतानाचा VIDEO व्हायरल करणाऱ्याला अटक, गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, “मी तणावात…”
दुसरीकडे, उदयनराजेंच्या भेटीबद्दल माहिती देताना गौतमी पाटील म्हणाली, “उदयनराजे यांच्याशी आज अचानक भेट झाली. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आले होते. त्यांचा आशीर्वाद कायम सोबत राहावा, यासाठी मी त्यांची भेट घेतली. उदयनराजेंना भेटायला जाताना मी पुष्पगुच्छ घेऊन गेले होते. पण एका सहकाऱ्याने सांगितलं की, उदयनराजेंना ‘परफ्यूम’ खूप आवडतो, त्यामुळे आता येत असताना मी उदयनराजेंसाठी ‘परफ्यूम’ विकत घेतला.”