काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते राजू वाघमारे यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजू वाघमारे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांनी प्रथमच आपली भूमिका जाहीर केली. “काँग्रेस पक्षाची सध्याची स्थिती बघता कोणाचाही पायपोस कोणात राहिला नाही. संपूर्ण काँग्रेस पक्ष वेगळ्या वातावरणामध्ये आहे. महाराष्ट्रातल्या काही नेत्यांच्या स्वार्थी आणि गलिच्छ राजकारणामुळे माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला पक्ष सोडावा लागत आहे. तन-मन-धनाने मी गेल्या ३५ वर्षांपासून काँग्रेसची सेवा केला. माझ्यासारखा कार्यकर्ता या विचारापर्यंत येतो. तेव्हा त्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे, हे सिद्ध होते”, अशी प्रतिक्रिया राजू वाघमारे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in