अलीकडील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याचा चर्चांना उधाण आलं आहे. ‘जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत. लवकरच ते मार्गक्रमक करतील,’ असं विधान शिवसेना ( शिंदे गट ) आमदार संजय शिरसाट यांनी केलं होतं. अशातच भाजपाने मोठा दावा केला आहे. जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार असून, त्याची १० कारणेही भाजपाने सांगितली आहेत.
भाजपाने एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओत म्हटलं की, शरद पवारांनी निवृत्ती नाट्य रंगवलं होतं. त्यात शरद पवार यांच्याव्यतिरिक्त जयंत पाटील यांनी चांगलं नाट्य केलं. किती रडले होते ते… आता जाणवतं ते अश्रू खरे होते, पण कारण वेगळं होतं. म्हणूनच जयंत पाटील बाहेर पडणार, अशी कुजबूज सुरू झाली आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्याकडं पक्षातून बाहेर पडण्यासाठी एक नाहीतर दहा कारणे आहेत.
हेही वाचा : संजय राऊतांनी शिंदे गटाची केली वॅग्नर लष्कराशी तुलना; म्हणाले, “हे भाडोत्री सैन्यच…”
भाजपाने सांगितली ‘ही’ कारणे
- २०१९ पासून शरद पवारांनी जयंत पाटलांना डावलण्यास सुरुवात केली. कधीकाळी गृहमंत्रालय भूषवणाऱ्या जयंत पाटलांना जलसंधारण मंत्रालयात देऊन नाचक्की केली.
- राष्ट्रवादीत सुप्रिया सुळे आणि अजित पवार असे दोन गट आहेत. त्यात पाटील दोन्ही गटातील नाही. त्यामुळे त्यांचं राष्ट्रवादीतील भविष्य अंधारात राहिलं.
- जयंत पाटील महत्वकांशी आहेत. त्यांना पडणारी उपमुख्यमंत्रीपदाची स्वप्न लपून राहिली नाही. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा गेला आहे. सुप्रिया सुळे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा झाल्याने अजित पवारांचे वांदे झाले आहेत. त्यामुळे जयंत पाटलांच्या स्वप्नांना कोण विचारणार.
- महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर जयंत पाटलांना विरोधी पक्षनेते बनायचं होतं. मात्र, तेव्हाही पाटलांची झोळी रिकामीच राहिली.
- कार्यकारी अध्यक्ष निवडताना शरद पवारांनी दोन्ही गटांना समाधानी केलं. सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचे समर्थक अशी ओळख असलेल्या प्रफुल्ल पटेलांना कार्यकारी अध्यक्ष केलं. तर, जयंत पाटलांना फक्त ठेंगा मिळाला.
- राज्याचे सर्व निर्णय अजित पवार घेतात, तर पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणाची धुरा शरद पवारांच्या हातात आहे. त्यामुळे जयंत पाटील नाममात्र प्रदेशाध्यक्ष आहेत.
- शरद पवार निवृत्त झालेच, तर अजित पवार आणि सुप्रिया सुळेंच्या हाताखाली काम करणे जयंत पाटलांना कठीण होईल.
- जयंत पाटलांना शरद पवारांसारखे आपल्या मुलाला राजकारण आणायचं आहे. प्रतिक पाटलांना राजाराम बापू साखर कारखान्याचा अध्यक्ष म्हणून निवडून आणलं. स्वत:च्या पुतण्याचा डावलणारे शरद पवार जयंत पाटलांच्या मुलाला थोडीच पुढे येऊन देणार.