IAS Pooja Khedkar Mother Manorama Khedkar : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या विविध कारणांमुळे वादात अडकल्या असतानाच त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचाही एक वादग्रस्त व्हिडीओ समोर आला होता. मुळशी तालुक्यातील एका जमीन प्रकरणावरून त्यांनी शेतकऱ्याला पिस्तुल दाखविले होते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पिस्तूल रोखणे आणि मारहाण प्रकरणी पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व प्रकरानंतर आता पूजा खेडकर यांचे वडील आणि माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी आपली मुलगी आणि पत्नी या दोघींचीही बाजू उचलून धरली. तसेच त्यांचे समर्थन केले. तसेच मुळशी येथे घडलेल्या घटनेची पार्श्वभूमीही सांगितली.
काय म्हणाले दिलीप खेडकर?
पत्नी मनोरमा खेडकर यांनी पिस्तुल का दाखविली याबाबत आज तकशी बोलताना दिलीप खेडकर यांनी या प्रसंगाच्या मागची पार्श्वभूमी सांगितली. ते म्हणाले, “माझी पत्नी मनोरमा आमच्या मालकीच्या जमिनीची पाहणी करण्यासाठी गेल्या असता तिथे आठ-दहा लोकांनी पत्नीवर हल्ला केला. त्याबाबत एफआयआर दाखल केलेला आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या दोन पिढ्याआधीच ती जमीन विकली गेली असून दोन तीन लोकांकडून ती आमच्यापर्यंत आली. त्यानंतरही हे शेतकरी आम्हाला तिथे जाण्यापासून अडवत आहेत. आम्हाला धमकावत आहेत.”
पिस्तुल कुणावरही रोखले नाही
मनोरमा खेडकर यानी स्वसंरक्षणासाठी पिस्तुल बाहेर काढले होते, त्यांनी पिस्तुल कुणावरही रोखून धरलेले नाही, असा बचाव दिलीप खेडकर यांनी केला. ते म्हणाले, “पोलिसांनी या प्रकरणात जरी गुन्हा दाखल केला असेल तरी त्यांना शेतकऱ्यांनी जी माहिती दिली, तीच जबाबात घ्यावी लागली. पण तपासाअंती सत्य समोर येईल. सदर पिस्तुलाचा परवाना मनोरमा यांच्या नावावरच आहे. त्यांनी स्वसंरक्षणासाठी ते पिस्तुल घेतले होते. त्यांनी पिस्तुल दाखवले असेल तरी त्यांनी ते कुणावरही रोखलेले नाही. फक्त स्वसंरक्षणासाठी ते हातात ठेवले होते. एकटी महिला दुर्गम भागात असलेल्या जमिनीची पाहणी करण्यासाठी कशी जाईल? यासाठी तिथे अंगरक्षक आणि पिस्तुल घेऊन जावे लागते.”
व्हिडीओमध्ये काय दिसले?
पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी त्यांच्या घरी चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर अरेरावी केली होती. त्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या मुळशी तालुक्यातील एका गावातील काही शेतकऱ्यांवर दमदाटी करत असल्याचा व्हिडीओ समोर आला. विशेष म्हणजे त्यांच्या हातात पिस्तुल दिसत असून त्यांच्यासोबत त्यांचे काही अंगरक्षकदेखील दिसून येत आहेत. एका जमिनीच्या मालकी हक्कावरून हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे.
पिस्तुल, बंदुक वापरण्याचा परवाना कुणाला मिळतो? कसा मिळतो?
मुळशी तालुक्यातल्या धडवली गावात जमिनीवरून वाद झाल्याचे सांगितले जात आहे. सदर घटना २०२३ मधील आहे. धडवली गावात खेडकर कुटुंबाने २५ एकर जमीन खरेदी केली होती. मात्र, ती जमीन ताब्यात घेताना त्यांनी शेजाऱ्यांचीही जमीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न केल्यामुळे तिथल्या गावकऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि त्यातून हा वाद उद्भवला होता, असे स्थानिक शेतकरी सांगत आहेत.