आजपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशना सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष आक्रमक झाला असून त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून आंदोलन केलं. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधानं करणाऱ्या नेत्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.

“भारतीय जनता पार्टीचे नेते व मंत्र्यांनी महापुरुषांचा केलेला अपमान महाराष्ट्रातील जनता विसरली नाही. जोपर्यंत या वाचाळविरांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत विरोधी पक्ष आवाज उठवत राहील. मंत्र्यांवर शाईपेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले, पत्रकारावर गुन्हे दाखल गेले. पोलिसांना निलंबित करण्यात सरकारने तत्परता दाखवली मग महापुरुषांचा अपमान करणारे भाजपा नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हे का दाखल केले नाहीत?” असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Image Of Jwala Gutta And L&T Chairman
“कर्मचाऱ्यांनी पत्नीकडे का पाहू नये?”, ज्वाला गुट्टाचा संताप; ‘L&T’च्या अध्यक्षांविरोधात वाढली टीकेची धार
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य
Register a case against Manoj Jarange Patil, protesters demand outside Shivajinagar police station in Pune
“मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा”, पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलकांची मागणी

हेही वाचा- अधिवेशनासाठी नागपूरला गेलेल्या शहाजीबापू पाटलांना राहण्यासाठी हॉटेल मिळेना? झाडी आणि डोंगरचा उल्लेख करत म्हणाले…

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधानभवनच्या पायऱ्यावर शिंदे-फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यपाल कोश्यारी यांच्यापासून महापुरुषांचा अपमान करण्याचे काम सुरू झालं. त्यानंतर भाजपा नेत्यांमध्ये महापुरुषांचा अपमान करण्याची स्पर्धाच लागली. भाजपाचा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी, मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान केला.

हेही वाचा- “ज्याच्या मेंदूमध्ये शेण भरलंय, त्या व्यक्तीला…”, अमोल मिटकरींची गोपीचंद पडळकरांवर खोचक टीका!

“उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही महापुरुषांनी भीक मागितली, अशी भाषा वापरून त्यांची बदनामी केली, अपमान केला. सातत्याने महापुरुषांचा अपमान करूनही भारतीय जनता पक्षाने या वाचाळविरांवर कारवाई केली नाही, हे अत्यंत लाजीरवाणे आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आमचा लढा सुरुच राहील,” असंही नाना पटोले म्हणाले.

Story img Loader