महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी गुढीपाडवा मेळाव्यादरम्यान माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम झालं असल्याचा एक व्हिडीओ दाखवला होता. समुद्रात अनधिकृतपणे दुसरा हाजीअली दर्गा बांधत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. एका महिन्याच्या आत हे बांधकाम हटवलं नाही तर आम्ही तिथे मोठं गणपती मंदिर बांधू असा इशारादेखील राज यांनी यावेळी दिला होता. त्यानंतर याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली असून महापालिकेकडून हे बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आहे.

या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना विचारले असता आझमी म्हणाले की, “इतक्या त्वरित कारवाई करण्यापेक्षा एकदा त्यांना नोटीस पाठवायला हवी होती. त्यांच्याकडे कागदपत्रं मागवायला हवी होती. ती तपासायला हवी होती. ते बांधकाम अनधिकृत आहे की अधिकृत आहे हे तपासायला पाहिजे होतं. एका मिनिटात तिथे जाऊन कारवाई करणं म्हणजे हे ध्रुवीकरण आहे. हा मुद्दा दुसऱ्या कोणाकडे जाऊ नये यासाठी ही कारवाई इतक्या तातडीने करण्यात आली.”

Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Ajit Pawar on Mahavikas Aghadi MLA's Oath as a Maharashtra Legislative assembly Member
“मविआ आमदारांना उद्या शपथ घ्यावीच लागेल, अन्यथा…”, अजित पवारांचा इशारा
uddhave thackeray gears up for bmc polls tells party workers to take hindutva agenda
हिंदुत्वापासून दुरावल्याचा अपप्रचार खोडून काढा; उद्धव ठाकरे यांचा माजी नगरसेवकांना आदेश
Mohit Kamboj
“तुला उचलणार”, सत्ता येताच भाजपाच्या मोहित कंबोजांची सोशल मीडियावरून धमकी; ठाकरेंच्या शिवसेना नेत्यानं दिलं आव्हान
Sanjay Raut vs Eknath Shinde
“शिंदेंना डॉक्टरची नव्हे मांत्रिकाची गरज”, ‘अमावस्ये’वरून ठाकरेंच्या शिवसेनेचा चिमटा; म्हणाले, “प्रकृती नाजूक असल्याने मंत्र्यांना…”
Uddhav Thackeray Meet Baba Adhav
Uddhav Thackeray : “राक्षसी बहुमत मिळाल्यावरही राजभवनात जाण्याऐवजी शेतात का जावं लागतंय”, ठाकरेंची बोचरी टीका, म्हणाले, “अमावस्येचा मुहूर्त…”
Devendra Fadnavis Eknath Shinde Amit SHah
“शिवसेनेची गृहमंत्रीपदाची मागणी, भाजपाचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले, मीडियासमोर वक्तव्य करून…”

हे ही वाचा >> संजय राऊतांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हटवलं, ‘या’ नेत्याचा दिल्लीत आवाज घुमणार

राज ठाकरेंचा आरोप काय?

माहीमजवळ समुद्रात अनधिकृतपणे दुसरा हाजीअली दर्गा बांधत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी कालच्या (२३ मार्च) गुढीपाडवा मेळाव्यात केला होता. या अनधिकृत बांधकामाची एक चित्रफितही त्यांनी भाषणावेळी दाखवली होती. ही मजार अनधिकृत असून ती तोडण्यात यावी, अशी मागणी त्यांनी काल केली होती. तसेच हे बांधकाम तोडलं नाही तर आम्ही तिथे सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं करू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर सरकारी यंत्रणा कामाला लागल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाने काल रात्रीच आदेश काढून हे बांधकाम पाडून टाकण्याबाबत पावले उचलली. सकाळी आठ वाजता पोलीस आणि पालिकेच्या जी उत्तर विभागाच्या पथकाची मदत घेत हे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले.

Story img Loader