नागपूरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका २४ वर्षीय तरुणीने तिच्या ३२ वर्षीय पतीचे व्हाट्सॲप हॅक केल्यानंतर, पती अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेल करत असल्याचे कळाले. यानंतर पत्नीने धाडसी पाऊल उचलत, एका किशोरवयीन बलात्कार पीडितेला तिच्या पतीविरुद्ध तक्रार दाखल करण्यास मदत केली, यानंतर आरोपी पतीला त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान यावेळी पत्नीने असाही आरोप केला आहे की, तिचा पती अनेकदा अनैसर्गिक लैंगिक मागणी करत तिला पॉर्नसारखे कृत्य करण्यास भाग पाडत असे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने बनावट नावे वापरून महिलांना फसवले. तो त्यांना आध्यात्मिक समारंभांसारख्या ठिकाणी भेटत असे आणि आमिष दाखवत असे. त्याच्या पत्नीने अलीकडेच त्याच्याविरुद्ध क्रूरतेचा खटला दाखल केला होता, ज्यामध्ये तो अनैसर्गिक लैंगिक मागण्या करत असे आणि तिला “अश्लील कृत्ये” करण्यास भाग पाडत असे. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.

दरम्यान या प्रकरणातील पत्नीला तिच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याचा फोन क्लोन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तिला यश आहे. फोन क्लोन केल्यानंतर तिला कळाले तिचा पती इतर महिलांनाही त्रास देतो. यावेळी ती त्याचे व्हाट्सॲपही हॅक करण्यात यशस्वी झाली, तेव्हा तिला अनेक महिलांचे आरोपीबरोबरचे आक्षेपार्ह स्थितीतील फोटो आणि व्हिडिओ सापडले.

पतीचे व्हाट्सॲप हॅक केल्यानंतर पत्नीला त्याचे महिलांबरोबरचे असे चॅट्स सापडले, ज्यामध्ये त्याने इतर महिलांना तो अविवाहीत असल्याचे सांगितले होते. तसेच आरोपीने काही महिलांकडून पैसेही मागितले होते. दरम्यान आरोपी महिलांना त्याच्यासोबत रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ आणि छायाचित्रांचा वापर करून त्यांना त्याच्या लैंगिक मागण्या पूर्ण करण्यास भाग पाडायचा.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या पत्नीने काही महिलांशी संपर्क साधला आणि त्यांना या अत्याचाराविरोधा पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले. अखेर, १९ वर्षांच्या एका तरुणीने आरोपीने केलेल्या लैंगिक शोषणाचा विरोधात तक्रार करण्यास होकार दिला आणि तक्रार दाखल केली.

आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली बलात्कार, ओळख लपवणे, धार्मिक श्रद्धा आणि नाव लपवणे, ब्लॅकमेलिंग आणि खंडणी वसूल करणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.