दापोली: आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करून आपण जणू काही केलेच नाही असं भासवणाऱ्या पत्नीनेच पतीचा आपल्या प्रियकराच्या साथीने गळा आवळून अत्यंत निर्घृणपद्धतीने खून करून मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचा धक्कादायक व संतापजनक प्रकार  दापोली तालुक्यात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पती बेपत्ता झाल्याची तक्रार देणाऱ्या पत्नीवरच दापोली पोलिसांचा संशय होता, त्या दिशेने तपास करून अवघ्या ४८ तासातच दापोली पोलिसांना या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात मोठे यश आले आहे.

केशकर्तनालयाचा व्यवसाय करणाऱ्या नीलेश दत्ताराम बागकर याचा कट रचून खून झाल्याच आता स्पष्ट झाल आहे. याप्रकरणी नेहा बागकर पालगड येथील एसटी चालक प्रियकर मंगेश चीजगरकर या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, दापोली शहराजवळ की,  गिम्हवणे येथे नीलेश बागकर व त्याचा भाऊ या दोघांचाही केशकर्तनालयाचा पारंपारिक व्यवसाय आहे. मृत नीलेश याची पत्नी नेहा बागकर हीच्याजवळ अनेकदा काही घरगुती कारणावरून वाद सुरू होते. आपल्या पत्नीचे बाहेर काही सुरू असल्याचा संशय नीलेश व काही नातेवाईकांना होता. मात्र आपल्या वाटेत अडथळे असलेल्या पती निलेश याला संपवण्याचा कट पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने आठवड्यापूर्वीच रचला होता अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Young man murdered over dispute over money
हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना
sonu sood on income tax raid
सोनू सूद आयकर विभागाने घरावर केलेल्या छापेमारीबद्दल झाला व्यक्त; म्हणाला, “माझ्या घरातील कपाटं आणि दरवाजांना…”
Raveena Tandon daughter Rasha Thadani Uyi Amma In Azaad watch video
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”
Image of Allahabad High Court
“पत्नीने अनैतिक संबंध न ठेवता इतरांना भेटणं म्हणजे…”, २३ वर्षांपासून वेगळं राहणार्‍या पती-पत्नीला घटस्फोट देताना न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
rajesh mapuskar rohan mapuskar
‘व्हेंटिलेटर’ फेम दिग्दर्शकाच्या मराठी सिनेमाची घोषणा, कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्कर करणार पदार्पण
Tharla Tar Mag New Year Promo
ठरलं तर मग : सासरेबुवांचं मन जिंकण्याचा अर्जुनचा निर्धार! मधुभाऊंना शब्द देत म्हणाला, “तोपर्यंत माझ्या मिसेस सायलींची…”

हेही वाचा >>>Saif Ali Khan : “फक्त सैफ अली खान याचं आडनाव खान आहे म्हणून…”, हल्ल्याबाबत गंभीर शंका घेणार्‍या आव्हाडांना गृहराज्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

आपल्या पती बेपत्ता असल्याचा तक्रार देणाऱ्या पत्नीला पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी चौकशीला बोलावले होते. त्यावेळी या प्रकरणातील संशयित आरोपी पत्नी नेहा ही जात असलेल्या हॉटेलमधील कामाचे टाइमिंग व तिने पोलिसांना चौकशी सांगितलेले टाइमिंग यामध्ये तफावत आढळताच पोलिसांचा तिच्यावरचा संशय वाढला. यावेळी तिला पुन्हा एकदा चौकशीला बोलवण्यात आलं होतं मात्र बुधवारी पत्नी नेहा हिला पोलीस पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतलं चौकशीचा पोलिसी हिसका दाखवताच त्यावेळी तिने या खून प्रकरणाची कबुलीच पोलिसांना दिली आहे. यावेळी कार मध्ये बसलेला नीलेश व त्याची पत्नी अशा स्वरूपाचं काही सीसीटीव्ही फुटेजही तपासात पोलिसांच्या हाती आले आहे.

या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी नेहा बागकर हिचा पालगड येथील एसटी चालक प्रियकर मंगेश चीजगरकर याच्या मदतीने हा खून केला आहे. मंगेश, नेहा व नीलेश यांचे गेल्या दहा-बारा वर्षांपासून घरगुती संबंध होते त्यामुळे मंगेश याच्याबरोबर कारमधून जाताना नीलेशला कोणताही संशय आला नाही  याच सगळ्याचा फायदा घेऊन हा कट रचण्यात आला होता अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी  हर्णै येथे मयत नीलेश पत्नी नेहा व मंगेश या तिघांनीही नीलेश याला कारमधून पार्टीसाठी नेले होते या ठिकाणी नीलेश व नेहा या दोघांनीही ड्रिंक केले व हर्णै बायपास येथे अत्यंत निर्दयीपणे निलेशाचा गळा होऊन नेहा व मंगेशने खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मंगेशला पालघर येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका विहिरीत निलेश चा मृतदेह कमरेला लोखंडी जड वस्तू बांधून टाकून देण्यात आला अशी ही कबुली नेहा बागकर हिने पोलीस तपासात दिली आहे. त्यानंतर तात्काळ पोलिसात पथकाने पालघर येथील विहिरीत गळ टाकून हा नीलेश याचा मृतदेह बाहेर काढला.

हेही वाचा >>>Varsha Gaikwad : ‘मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे, राज्यात जे घडतंय ते…’, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर वर्षा गायकवाड संतापल्या

यावेळी नेहाचा प्रियकर संशयित मंगेश हा फरार झाला होता. त्याचा शोध दापोली पोलिसांनी काही तासात लावत दापोली एसटी डेपोतून एका बंद गाडीमध्ये बसला होता. त्याला बुधवारी मध्यरात्री उशिरा पोलीस पथकाने ताब्यात घेऊन चौकशीनंतर उशिरा अटक केली आहे. दापोली पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. हत्या करणे, हत्येचा कट रचणे, पुरावा नष्ट करून मिळून गुन्हा करणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे ,सहाय्यक निरीक्षक प्रवीण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली ढोले या पोलीस पथकाने या सगळ्या प्रकरणाचा अवघ्या काही तासात छडा लावला आहे.

Story img Loader