Bharat Gogawale on Ministership : राज्यात शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर भरत गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल अशी अपेक्षा होती . पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना शेवटच्या क्षणी प्रतिक्षा यादीवर ठेवण्यात आले. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारातही त्यांना स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांना संधी दिल्याने, गोगावले पुन्हा एकदा मंत्री पदाच्या प्रतीक्षेत राहिले आहेत. लवकरच माझा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल असा आशावाद ते सतत व्यक्त करत राहीले. मात्र शेवटपर्यंत गोगावले यांची मंत्री पदावर वर्णी लागली नाही. त्यामुळे आतातरी त्यांना संधी मिळतेय हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, यावरून त्यांनी आज एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत मिश्किल टिप्पणीही केली आहे.
महाड विधानसभा मतदारसंघातून भरत गोगावले १ लाख १७ हजार ४४२ मतांनी विजयी झाले. तर, त्यांच्याविरोधात असलेल्या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या स्नेहल जगताप २६ हजार मतांनी पराभूत झाल्या. शिवसेनेत फूट पडल्यापासून भरत गोगावलेंनी शिवसेनेची सातत्याने बाजू सांभाळली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सतत उभे राहिले. त्यामुळे आपल्याला नक्कीच मंत्रिपद मिळेल अशी आशा त्यांनी कायम ठेवली. तसंच, मंत्रिपदासाठी कोट शिवून घेतला असल्याचंही वक्तव्य त्यांनी मागच्या वेळी केलं होतं. त्यामुळे यंदा तरी त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.
मंत्रिपदाच्या प्रश्नावर भरत गोगावले म्हणाले, मी २६ हजारांनी मी निवडून आलो आहे. टीका टिप्पणी करणाऱ्यांनीही आम्हाला मते दिलीत. फुल्ल स्वींगमध्ये आम्ही आहोत. तिन्ही पक्षाचे चांगले आमदार निवडून आले आहेत. काळजी करण्याचं कारण नाही. टीका टिप्पणी करणाऱ्यांची तोंडं बंद केली आहेत. मी मंत्रीपदाबद्दल या अगोदर बोललो नव्हतो. आता आमचा नंबर असावा असं मला वाटतं.”
हेही वाचा >> आमदार भरत गोगावले यांच्यावर गुन्हा दाखल करा, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीची मागणी
आताही मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट शिवून ठेवलाय का असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले, “आताही बॅगेत कोट आणले आहेत. चार कोट आणले आहेत. हवंतर तुम्हाला दाखवतो. काळजी करण्याचं कारण नाही. कोटावर कोणी जाऊ नका, ओठावर जा.”
भरत गोगावलेंचं मंत्रिपद आतापर्यंत कितीवेळा रखडले
विरोधकांकडून होणाऱ्या टीकेनंतर गोगावले यांनी आपली मंत्री पदाची इच्छा कधी लपवून ठेवली नाही. याबाबत जाहीर कार्यक्रम असो अथवा पत्रकार परिषद ते कायमच बोलत आले. आपली मंत्री पदावर का वर्णी लागली नाही याचा किस्साही त्यांनी सांगितला होता. राज्यात महायुतीच्या स्थापने नंतर मंत्रीमंडळात माझे नाव होते. पण शिवसेनेच्या एका आमदाराने मंत्रीपद मिळाले नाही तर माझी बायको आत्महत्या करेल असे सांगितले. दुसऱ्याने नारायण राणे मला संपवून टाकतील असे सांगितले. त्यामुळे त्या दोघांना मंत्रीपदे दिली गेली. तिसऱ्याने मला मंत्रीपद दिले नाही तर राजीमाना देण्याची धमकी दिली. त्यांना संभाजीनगरमध्ये दोन मंत्रीपदे दिली. तु घाई करू नको म्हणून समजूत काढली आणि कसेतरी थांबवले. आजकाल पंचायत समितीचे सदस्यपदही कोणी सोडत नाही, पण सरकार अडचणीत येईल आणि एकनाथ शिंदे यांची कोंडी होईल म्हणून मी थांबलो असा रंजक किस्सा गोगावले यांनी सांगितला होता.
दुसऱ्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात गोगावले यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या सत्तेत सहभागी झाली, त्यांना नऊ मंत्रीपदे दिली गेली. त्यामुळे शिवसेनेचे गोगावले पुन्हा एकदा प्रतीक्षा यादीवर राहीले. नंतर नवरात्री, दिवाळी, हिवाळी आधिवेशनापूर्वी, लोकसभा निवडणूकीनंतर मंत्रीमंडळ विस्तार होईल अशा वावड्या उठत राहील्या.
तेव्हा सगळे प्रयत्न करून दमलो, आता देवाला कौल लावून विचारायचे राहिले आहे. काय अडचण आहे ते बघावे लागेल, मानपान राहीला असेल तर तो ही करावा लागेल असे म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली होती. माझ्या मंत्रीपदासाठी महादेवाला साकडे घाला असे आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केले होते. गावकऱ्यांनी घातलेले साकडे काही प्रमाणात का होईना मान्य झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गोगावले यांना एस टी महामंडळाचे अध्यक्ष पदावर वर्णी लागली आणि नावाला का होईना त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जाही देण्यात आला.