नागपूर सुधार प्रन्यासमधील ( एनआयटी ) भूखंड नियमीकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झालेल्या आरोपांमुळे चांगलेच अडचणीत आले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गट आणि भाजपातील आमदारांनी दिशा सालियनच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली. या मागणीनंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत ( एसआयटी ) चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत करून शिवसेनेला ( ठाकरे गट ) शह देण्याचा प्रयत्न केला.

शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरण सभागृहात उपस्थित केला. तिच्या मृत्यू प्रकरणात अनेक बाबी समोर आलेल्या नाही. दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत यांचे भ्रमणध्वनी संभाषण, दिशाचा शवविच्छेदन अहवाल, त्यावेळी तिच्याबरोबर कोण होतं. तिथे नेमकं काय घडलं, या बाबी समोर आल्या नसल्याचा दावा गोगावलेंनी केला. भाजपा आमदार नितेश राणे, अमित साटम, माधुरी मिसाळ आणि अन्य आमदारांनी चौकशी करण्याची मागणी केली होती.

amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”

हेही वाचा : दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशी तुम्ही कुठे होतात? आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन; म्हणाले “माझ्या आजोबांचं…”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “एसआयटी चौकशीने आमची मुलगी परत येईल का? हे सगळ का करण्यात येत आहे? दिशाची केस मुंबई पोलिसांनी आधीच बंद केली आहे. याबाबत बरीच चौकशी झाली असताना आता पुन्हा का चौकशी? आम्ही शांततेत जगत आहोत. आम्हाला काहीही नको आहे. आता आम्हाला कशातही अडकायचं नाही आहे,” असं दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना सांगितलं आहे.

हेही वाचा : सभागृहात नेमकं काय घडलं? शरद पवारांचा अजित पवारांना फोन

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“मुंबई पोलीस दिशा सालियन प्रकरणाची चौकशी करत आहेत. या विषयासंबंधी कोणाकडे अधिक पुरावे असल्यास सादर करावे. या प्रकरणाची चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत करण्यात येईल. कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता जे पुरावे समोर येती त्या आधारे निष्प:क्ष चौकशी केली जाईल,” असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं.