महाविकास आघाडी कोसळल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. या घटनेला आता एक वर्षाहून अधिकचा काळ लोटला आहे. तरीही शिंदे गटातील अनेक नेत्यांचा अद्याप मंत्रिमंडळात समावेश करून घेतला नाही. शिंदे गटाला मंत्रीमंडळ विस्ताराच्या नवनवीन तारखा दिल्या जात असताना काही दिवसांपूर्वी अचानक अजित पवार गटाचा सत्तेत समावेश झाला. काही महत्त्वाची मंत्रिपदं अजित पवार गटातील नेत्यांना देण्यात आली. यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा आहे.

अशी एकंदरीत राजकीय स्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा उर्वरित गटही सत्तेत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा उर्वरित गट सत्तेत सहभागी झाल्यास त्या गटातील नेत्यांनाही राज्यमंत्रीपदं दिली जातील, अशी चर्चा आहे. तसेच १० ते १२ ऑगस्टदरम्यान, मंत्रीमंडळ विस्तार होईल, असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. या सर्व घडामोडींवर आता शिंदे गटाचे समर्थक आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

U S President Donald Trump
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, सीएफपीबीचे संचालक रोहित चोप्रा यांना पदावरून हटवलं
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Congress MLAs praises of Haryana CM Saini
Congress : हरियाणा काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर? दोन आमदारांनी केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Donald trump latest news in marathi
ट्रम्प यांच्या धोरणांवर भारताची सावध माघार !
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही, सगळे आपलेच लोक”, राधाकृष्ण विखे पाटलांचं धक्कादायक विधान
donald trump executive decisions
ट्रम्प धोरणांची धडकी!

हेही वाचा- “खेकड्यांना सांभाळलं असतं तर…”, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर गुलाबराव पाटलांचा टोला

“माझं काय होईल? याची कुणीही चिंता करू नये. मी आमदार असो वा नसो किंवा मी मंत्री असो वा नसो, याची मला काहीही चिंता नाही. मला मंत्रिपदाचं आश्वासन दिलं होतं. पण आता मी स्वत: मंत्रीपद नाकारलं आहे. त्यामुळे तो विषय आता संपला आहे”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

हेही वाचा- “उद्धव ठाकरेंचं मानसिक खच्चीकरण…”, गोपीचंद पडळकरांची खोचक टीका

संभाव्य मंत्रीमंडळ विस्तारावर भाष्य करताना बच्चू कडू पुढे म्हणाले, “ज्या दिवशी मंत्रीमंडळ विस्तार होईल. त्या दिवशी मी अमेरिकेत जाऊन बसणार आहे.”

Story img Loader