कथिक ऑडिओ क्लिप प्रकरणापासून सुरू झालेला अनिल परब आणि रामदास कदम यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचला आहे. रामदास कदम यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेतील अंतर्गत कलहाला अखेर वाचा फोडली आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी परिवहन नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली बाजू मांडली होती. त्यानंतर आता पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांनी आपल्यावर अन्याय होत असून उद्ध ठाकरे यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी बोलताना त्यांनी माझी हकालपट्टी केली तरी मी शिवसैनिक म्हणूनच जगेन असे रामदास कदम यांनी म्हटले आहे. “मी शिवसेनेतून कदापि बाहेर पडणार नाही. पण माझी मुलं निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. माझ्या मुलाच्या भवितव्यावर घाव घातला जातोय. मला पक्षातला काढलं, हकालपट्टी केली तरी मी शिवसैनिक म्हणूनच जगेन,” असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
maharashtra vidhan sabha election 2024 Sanjay Puram vs Rajkumar Puram in Amgaon-Devari constituency
आमगाव-देवरीत संजय पुराम विरुद्ध राजकुमार पुराम सामना; माजी आमदारापुढे माजी सनदी अधिकाऱ्याचे आव्हान
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
prakash ambedkar dawood ibrahim
Prakash Ambedkar: “शरद पवार-दाऊद इब्राहिमच्या कथित भेटीची चौकशी करा”, प्रकाश आंबेडकरांची आरोपवजा मागणी
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’

“अनिल परबांना एसटी कामगारांसाठी वेळ नाही पण माझ्या मुलाला…”; रामदास कदमांचा हल्लाबोल

“मला राजकारणातून संपवण्याचा डाव शिवसेनेमधल्या काही नेत्यांचा आहे. अनिल परब यांनी वांद्रे येथून निवडून येऊन दाखवावे. तुम्ही आज उद्धव ठाकरेंसोबत असाल याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या शिवसेना नेत्याला आणि त्याच्या मुलाला संपूर्ण राजकारणातून कायमाचे संपवायचे. माझ्या मुलाला तिकिट मिळू नये म्हणून अनिल परब राष्ट्रवादीच्या नेत्यांना मातोश्रीवर घेऊन आले होते. उद्धव ठाकरेंनी त्यांचे ऐकले नाही. तो राग मनामध्ये ठेवून अनिल परब रत्नागिरीचे पालकमंत्री झाल्यानंतर योगेश कदमबाबत सुडाची भावना बाळगली. दोन वर्षामध्ये अनिल परब यांनी माझ्या मुलाचा एकही फोन उचलला नाही. अनिल परबांनी तिथे मनसेच्या वैभव खेडेकर आणि संजय कदम यांना सातत्याने पाठीशी घालण्याचे काम केले,” असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

“माझं आणि मुलाचं तिकीट कापण्यासाठी अनिल परबांचे प्रयत्न”, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप!

“स्थानिक आमदारांना डावलून सातत्याने आमच्या मुळावर उठण्याचे काम अनिल परब यांनी केले आहे. गद्दार कोण हे महाराष्ट्राच्या शिवसैनिकांना कळले पाहिजे. अनिल परबांना मंत्रीपद मिळाल्यानंतर ते पक्षासोबत गद्दारी करत आहेत. दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनिल परबांनी सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र करुन दोन उमेदवार निश्चित केले आहेत. त्याबाबत पक्षाला कळवल्यानंतर त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या निवडणुकीसाठी अनिल परब यांनी त्यांच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये बैठक बोलवली होती. त्याला सुनील तटकरे आणि शिवसेना विराधोत काम करणारे सूर्यकांत दळवी यांना बोलावले होते. पक्षाची निष्ठा आम्हाला शिकवणारे उदय सामंत यांनाही त्यांनी बोलवले होते. त्यानंतर तिकिटी वाटप करुन राष्ट्रवादीला पहिले अडीच वर्षाचे नगराध्यक्ष पद दिले. शिवसेना राष्ट्रवादीकडे गहाण ठेवणारे अनिल परब गद्दार की रामदास कदम गद्दार? शिवसेनेला राष्ट्रवादीच्या घश्यामध्ये टाकणारे अनिल परब निष्ठावाण कसे असू शकतात,” असा सवाल रामदास कदम यांनी केला आहे.