गेली ४० वष्रे राजकारणात आणि भाजपसाठी काम करीत असतानाही मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली. त्यासाठी असतील त्या त्रुटी किंवा उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करीन, असे प्रतिपादन करीत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली.
प्रदेशाध्यक्षपदाच्या वेळीही आपल्याऐवजी नितीन गडकरी यांची निवड २००० मध्ये झाल्याची आठवण सुयोग या विश्रामधामी पत्रकारांशी बोलताना खडसे यांनी सांगितली. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपली निवड केल्याचे सांगितले, आपले सर्वानी अभिनंदन केले. पण ऐन वेळी गडकरी यांचा दूरध्वनी आला व त्यांची निवड झाल्याचे सांगण्यात आले. मुलगी बघायला गेल्यावर ऐन वेळी वरमाला दुसऱ्याच्याच गळ्यात पडल्याचे प्रसंग घडले. सुधीर मुनगंटीवार प्रदेशाध्यक्ष झाले, तेव्हा मला ते पद स्वीकारण्याची गळ घातली गेली. पण प्रकृती ठीक नसल्याने मी त्या वेळी नाकारले. फडणवीस यांचे नावही मी राजनाथ सिंह यांना कळविले व त्यानंतर त्यांची निवड करण्यात आली. पण मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असूनही निवड होऊ शकली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will improve my self eknath khadse