आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यात ‘खोक्यां’वरून वाद रंगला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्तीनंतर रवी राणांनी दिलगिरी व्यक्त करत बच्चू कडू यांची माफी मागितली होती. तर, बच्चू कडू यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आज ( १ नोव्हेंबर ) ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांची अमरावतीत बैठक पार पडली. यात बच्चू कडू यांनी रवी राणांना माफ केल्याचं जाहीर केलं.

“कोणीही यावं आणि काहीही म्हणावं एवढे आम्ही सोप्पं नाही. पहिली वेळ असल्याने माफ करतो. पण, यानंतर कोणीही आमच्याविरुद्ध बोललं, तर ‘प्रहार’चा वार दाखवू. आम्ही गांधीजींना मानतो, मात्र भगतसिंह डोक्यात आहे,” असे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Vikrant Massey family religion variety
“माझे ख्रिश्चन वडील ६ वेळा वैष्णोदेवीला गेले, तर मुस्लीम भाऊ…”; बॉलीवूड अभिनेत्याचा कुटुंबाबद्दल खुलासा

हेही वाचा : अमरावतीत बच्चू कडूंचे शक्तीप्रदर्शन; म्हणाले, “विनाकारण तोंड माराल, तर…”

“रवी राणांनी दिलगीरी व्यक्त केली, त्याचा आनंद आहे. अन्यथा आम्हाला उगाच अधिक हातपाय हालावावे लागले असते. पण, रवी राणांनी मोठेपणा घेत चूक लक्षात आली आणि माफी मागितली, त्याबद्दल पुन्हा आभार मानतो. आपण दोन पावले मागे घेतले, आम्ही चार पावले माघे घेऊ. विनाकारण आम्हाला उर्जा संपवायची नाही आहे,” असेही बच्चू कडू यांनी सांगितलं.