भाजपा नेते सनी निम्हण यांनी आज पुण्यात आपले वडील आणि माजी आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी भाजपाचे आमदार गिरीश महाजन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. आरोग्य शिबीराच्या निमित्ताने अजित पवारांनी गिरीश महाजनांच्या फिटनेसची स्तुती केली. यावर आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली.

अजित पवारांबरोबर माझा सुरुवातीपासून राजकीय विरोध होता. त्यांनी २० वर्षांच्या कार्यकाळात माझ्या मतदारसंघासाठी एक रुपयाही दिला नाही. निधी देणार नाही, असं आव्हान त्यांनी मला दिलं होतं. त्यांनी त्यांचा शब्द पाळला, कारण अजित पवार शब्दाचे पक्के आहेत. आता आम्ही मित्र झालो आहोत. त्यामुळे ते माझं कौतुक करत होते. ते नेहमी मला भेटले की माझे बायसेप (दंड) तपासतात, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Akshay Shinde Hearing
Akshay Shinde Encounter : “पिस्तुल खेचेल एवढी त्याच्यात ताकदच नव्हती”, वकिलांनी दिली कोर्टात माहिती; म्हणाले, “पालकांकडून त्याने ५०० रुपये…”
29th September rashibhavishya in marathi
२९ सप्टेंबर पंचांग: भाग्याची साथ की आर्थिक घडी…
pune police crack murder case of young man in hadapsar area
नशेबाजांकडून तरुणाचा खून; पत्नी, आईला माहिती दिल्याने खून केल्याचे उघड
Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana
Aditi Tatkare : लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेल्या महिलांना पैसे कधी मिळणार? आदिती तटकरे म्हणाल्या…
dr Ajit Ranade
डॉ. अजित रानडे यांची नियुक्ती रद्द केल्याने बुद्धिवंतांमध्ये नाराजी
anna hazare arvind kejriwal
Anna Hazare : “मी त्यांना आधीच सांगितलेलं…”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
CM Mamata Banerjee at JR doctors protest place near Swasthya
Kolkata Rape Case : “हा माझा शेवटचा प्रयत्न”, आंदोलकांच्या भेटीला गेलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा आंदोलक डॉक्टरांना इशारा!
cyber crime
Nagpur Crime News : सायबर चोरट्यांनी ६० लाखांचा ऑनलाईन गंडा घातल्यानंतर ५१ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

हेही वाचा- सरकारचा जाहिरातबाजीवर दिवसाला २० लाख रुपये खर्च; रोहित पवारांनी शेअर केली आकडेवारी, म्हणाले…

अजित पवारांनी फिटनेसचं कौतुक केल्याबाबत विचारलं असता गिरीश महाजन म्हणाले, “आज मैत्रीदिवस आहे. अजित पवार आणि माझा सुरुवातीपासून एकमेकांना राजकीय विरोध होता. अजित पवारांनी वीस वर्षांच्या कार्यकाळात माझ्या मतदारसंघासाठी एक रुपयाही दिला नव्हता. त्यांनी मला आव्हान दिलं होतं की, तुझ्या मतदारसंघात एक रुपयाही देणार नाही. त्यांनी त्यांचा शब्द पाळला. कारण अजित पवार शब्दाचे पक्के आहेत. आम्ही आता मित्र झालो आहोत. आज ते माझं कौतुक करत होते.”

हेही वाचा- भाजपा खासदार राम शंकर कठेरिया यांना दोन वर्षांची शिक्षा, खासदारकी रद्द होण्याची शक्यता

“अजित पवार जेव्हा मला भेटतात, तेव्हा ते नेहमी माझे बायसेप (दंड) बघतात आणि विचारतात, हे कसं केलं? मी त्यांना सांगतो, की दादा रोज व्यायाम केला पाहिजे. मी रोज एक तास जिममध्ये जातो. खाण्या-पिण्यावर माझे खूप निर्बंध आहेत. मी तळलेले पदार्थ कधीच खात नाही. मी हॉटेलमध्ये कधीच जेवत नाही. प्रवासात असलो तरी मी घरचं जेवण जेवतो. मी एखाद्या कार्यकर्त्याकडून किंवा अधिकाऱ्याकडून पोळी-भाजीचा डब्बा मागवून घेतो आणि गाडीतच जेवतो. पण मी बाहेरचं खात नाही. केवळ राजकारणी लोकानीच नव्हे तर प्रत्येकानं या गोष्टी पाळल्या पाहिजेत. प्रत्येकानं आपलं आरोग्य जोपासलं पाहिजे,” असंही गिरीश महाजन पुढे म्हणाले.