स्वगृही परत जाण्याची आस लावून बसलेले एकनाथ खडसे यांची कन्याही भाजपात येणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसेही एकनाथ खडसेंसह राष्ट्रवादी गेल्या होत्या. परंतु, तिथून परत येताना एकनाथ खडसे एकटेच येणार आहेत. यावरून एकनाथ खडसे यांनी एबीपी माझाला माहिती दिली.

उत्तर महाराष्ट्रातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक हरलेल्या रोहिणी खडसे २०२० मध्ये एकनाथ खडसे यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या. एकनाथ खडसे यांनी ४० वर्षांचे भाजपाबरोबरचे ऋणानुबंध तोडून शरद पवारांना साथ दिली. शरद पवारांच्या साथीने एकनाथ खडसे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाले होते. परंतु, राष्ट्रवादीत भवितव्य दिसत नसल्याचं कारण दे त्यांनी पुन्हा भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही काळात त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश होईल. परंतु, त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीत गेलेल्या त्यांच्या कन्या रोहिणी खडसे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहेत.

Two tigress cubs die in Pench Tiger Reserve
वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू, एकाचा जीवनमरणाचा संघर्ष…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
अमित शहां यांना अनिल देशमुखांचे चोख उत्तर म्हणाले,”शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा भाजपच दगाबाज “
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस
Excessive use of chemical fertilizers disrupts the natural chain says MLA Arun Lad
रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे निसर्ग साखळी विस्कळीत – आमदार अरूण लाड

हेही वाचा >> “मी यापुढे निवडणूक लढवणार नाही”, एकनाथ खडसेंची मोठी घोषणा; म्हणाले, “राजकारणातून निवृत्ती…”

याबाबत एकनाथ खडसे म्हणाले, मी ज्यावेळी भाजपात जायचं ठरवलं तेव्हा मी रोहिणीताईंनाही सांगितलं की माझ्याबरोबर भाजपात चला. परंतु, रोहिणीताईंनी सांगितलं की मी शरद पवारांबरोबरच राहु इच्छिते. गेले काही वर्षे मी येथे काम करते आहे. मला इथे मान सन्मान दिला आहे. आणि मला त्यांची तत्वे आवडतात. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहीन. मला पुढच्याही निवडणुका लढवायच्या आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भवितव्य आहे, असं तिला वाटतंय. म्हणून तिने भाजपात माझ्याबरोबर येण्यास नकार दिला.”

हेही वाचा >> मनोज जरांगेंनी उडवली खिल्ली, “चंद्रकांत पाटलांना काय कळतं? ‘तेरे नाम’ भांग पाडून..”

रोहिणी खडसे राष्ट्रवादीचंच काम करणार

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून मुक्ताईनगरसाठी एकनाथ खडसेंना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर, शरद पवारही रोहिणी खडसेंना संधी देतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे बाप-लेकीत हा सामना रंगू शकतो. याबाबत एकनाथ खडसे म्हणाले, रोहिणीताई राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे त्या प्रामाणिकपणे राष्ट्रवादीच्या प्रचाराचं काम करत आहेत. त्यामुळे नंतरच्या कालखंडात मी भाजपाचा प्रवेश केला तर भाजपाचंच काम करणार. मी यापुढे निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. मी सध्या विधान परिषदेचा आमदार आहे. शरद पवारांनी मला सांगितलंय की मी दिलेली वस्तू परत घेत नाही. शरद पवारांनीच मला अभय दिलं असल्याने मला दुसरा कोणी राजीनामा मागितला तरी फरक पडत नाही.

Story img Loader