विधान परिषदेच्या दहा जागांसाठी सध्या विधान भवनात मतदान प्रक्रिया सुरु आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार क्रमाक्रमाने मतदान करत आहेत. असे असताना राज्यसभेच्या निवडणुकीदरम्यान संजय राऊत यांनी ज्यांच्यावर शंका उपस्थित केली होती ते करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे कोणाला मतदान करणार असे विचारले जात होते. याच प्रश्नाचे उत्तर खुद्द संजयमामा शिंदे यांनी दिले असून संजय राऊतांनी जे वक्तव्य केले होते, तो विषय संपला आहे. माझे मत महाविकास आघाडीलाच असेल असे संजयमामा शिंदे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >>> विधान परिषद निवडणूक : ‘पक्षाच्या कँपमध्ये असताना आमदारांना धमक्यांचे निरोप,’ संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rss bjp tussle ends maharashtra vidhan sabha election 2024
वादावर पडदा, RSS भाजपासाठी मैदानात; विधानसभेसाठी यंत्रणा कार्यान्वित!
former ministers who rebel and won
अनेक माजी मंत्री, आमदारांचा बंडखोरी करून विजयाचा इतिहास, देशमुख, केदार, बंग, जयस्वाल आदींचा समावेश
ubt mla vaibhav naik face nilesh rane kudal in assembly constituency
लक्षवेधी लढत : कुडाळमध्ये राणेंच्या वर्चस्वाचा कस
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : ‘महायुतीला किती जागा मिळतील?’ एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही…”
maharashtra assembly election 2024 maha vikas aghadi vs mahayuti battle in konkan region
विश्लेषण : कोकणात लोकसभेतील यशाची पुनरावृत्ती महायुती दाखवणार का? महाविकास आघाडीला संधी किती?

“राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये मी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. यावेळी विधान परिषदेच्या निवडणुकीलाही मी महाविकास आघाडीलाच मतदान करणार आहे. संजय राऊत हे राज्यातील वरिष्ठ नेते आहेत. देशपातळीवर ते स्वाभिमानने राज्याची बाजू मांडतात. त्यांच्याकडून ते वक्तव्य गैरसमजूतीतून आले असले तरी त्यांनी नंतर त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं. अनावधानाने हे वक्तव्य केले असे राऊत म्हणाले होते. आता तो विषय संपला आहे. महाविकास आघाडीचाच विजय होणार आहे,” असे संजयमामा शिंदे म्हणाले आहेत. टीव्ही ९ मराठीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

हेही वाचा >>> विधान परिषद निवडणूक : ‘मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार,’ अनिल बोंडे यांच्या सूचक ट्वीटमुळे चर्चेला उधाण

राज्यसभा निवडणुकीदरम्यान, शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला होता. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का होता. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसमोर जाहीरपणे काही अपक्ष आमदारांची नावे घेत त्यांनी महाविकास आघाडीला मतदान न केल्याचा दावा केला. राऊत यांनी यामध्ये संजयमामा शिंदे याचेदेखील नाव घेतले होते. त्यानंतर शिंदे यांनी आक्रमक पवित्रा धारण करत आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता हा विषय संपला असून मी महाविकास आघाडीसोबत असल्याचे शिंदे म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> विधान परिषद निवडणूक : शिवसेना आमदारांच्या नाराजीवर विजय वडेट्टीवार यांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले…

दरम्यान, अजूनही विधान परिषद निवडणुकीसाठी आमदार मतदान करत आहेत. एकही मत बाद होऊ नये म्हणून सर्वच पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. काहीही झालं तरी आमच्याच सहा उमेदवारांचा विजय होणार असा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त केला जातोय. तर महाविकास आघाडीचा कोणत्याही एका उमेदवाराचा पराभव होणार असून आमचे पाच पैकी पाच उमेदवार पराभूत होणार, असा दावा भाजपाकडून केला जातोय. संध्याकाळी या निवडणुकीचा निकाल लागणार असून तेव्हाच चित्र स्पष्ट होणार आहे.