महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आले आहेत. भारतीय जनता पार्टीबरोबर सत्ता स्थापन करून जवळपास आठ महिने उलटले आहेत. दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हे सरकार अल्पावधीच कोसळेल, असा दावा केला होता. मात्र, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मजबूत आहे, असं चित्र आतापर्यंत दिसलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशी एकंदरीत राजकीय परिस्थिती असताना आगामी निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपा युतीकडून मुख्यमंत्री पदाचा प्रमुख चेहरा कोण असणार? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. २०२४ मध्येही तुम्हीच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार का? असं विचारलं असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर देणं टाळलं आहे. कुणाला मुख्यमंत्री करायचं हे जनतेच्या हातात असतं, आम्ही काम करायचं आहे, आम्ही काम करू… असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं. ते ‘एबीपी’ वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा- “खोक्यांचे व्यवहार करतानाचे उद्धव ठाकरेंचे कॅसेट…”, नारायण राणेंचा गंभीर आरोप

२०२४ मध्ये तुम्हीच मुख्यमंत्री असणार का? असं विचारलं असता एकनाथ शिंदे म्हणाले, “हे पाहा, हे सर्व जनतेच्या हातात असतं. कुणाला मुख्यमंत्री करायचं आणि कुणाला मुख्यमंत्री पदावरून हटवायचं, याचा निर्णय जनताच घेत असते. आम्ही काम करणार आहोत. आम्हाला दिवस रात्र एक करून काम करायचं आहे. आज आम्ही राज्यात मोठमोठे प्रकल्प उभारत आहोत. आम्ही आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, शेती आणि पायाभूत सुविधा अशा सर्वच क्षेत्रात काम करत आहोत. आम्ही प्रत्येक क्षेत्राचा विकास करू इच्छित आहोत.”

हेही वाचा- “माझ्या नादी लागू नका, नाहीतर पुण्यात येऊन…”, नारायण राणेंचा अजित पवारांना थेट इशारा!

“महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमाकांचं राज्य आहे. महाराष्ट्राचा जीडीपी १५ टक्के आहे. महाराष्ट्राची निर्यात २५ टक्के इतकी आहे. थेट परकीय गुंतवणूक १७ ते २० टक्के आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचं खूप मोठं योगदान आहे. त्यामुळे आम्ही काम करणार आहोत,” असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will you chief minister even in 2024 eknath shinde gave answer assembly election rmm
Show comments