“वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावणाऱ्या सुषमा अंधारे यांच्यावर उद्धव ठाकरे काय कारवाई करणार?” असा सवाल भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण, सुषमा अंधारेंनी हिंदू देवी-देवता आणि साधु संतांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असून, यावरून महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ आक्रमक झाला आहे. वारकरी महामंडळाकडून सुषमा अंधारेंविरोधात तक्रारदेखील दाखल करण्यात आहे. याशिवाय भाजपानेही यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुरू केली आहे.

Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech in Mumbai
Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाजपा नेत्यांबाबत भाष्य, “मुंबईत चहा प्यायला घरी येतो म्हटल्यावर काय सांगायचं, घरीच..”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Walmik Karad, Dhananjay Munde
“फरार असताना वाल्मिक कराडने संपत्तीचं…”, ठाकरे गटाला वेगळाच संशय; धनंजय मुंडेंचा उल्लेख करत म्हणाले…
A youth from Bihar files a case against Rahul Gandhi seeking Rs 250 as compensation, highlighting the ongoing legal dispute.
Rahul Gandhi : “ते विधान ऐकून धक्का बसला अन् हातातून दुधाची बादली पडली”, २५० रूपयांसाठी राहुल गांधींविरोधात तरुणाची याचिका

हेही वाचा – ‘भाजपाने चीनच्या शी जिनपिंग यांचा आदर्श घेतला का?’ – महाराष्ट्राच्या सीमेवर गुजरातच्या घुसखोरीवरून सचिन सावंतांचे टीकास्त्र!

याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले आणि मग त्यांना जे जे लोक प्रिय होऊ लागले, त्यामध्ये सुरुवातीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समजावादी पार्टी, कम्युनिस्ट तसेच हिंदुत्व विरोधी असलेल्या सुषमा अंधारे या त्यांना जवळच्या वाटायला लागल्या, त्यामुळे आमचा सवाल उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला आहे, की तुम्ही सुषमा अंधारेंची हकालपट्टी करणार का? तुम्ही सुषमा अंधारेंवर कारवाई करणार का? तुम्ही सुषमा अंधारेंकडून या सगळ्या प्रकरणात वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर जी वक्तव्ये हिंदू धर्मास दुखावणारी आली आहेत, त्या बाबत काय भूमिका घेणार आहात? उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी, अशी आमची त्यांना विनंती आहे.”

Story img Loader