महाराष्ट्र राज्यातील मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० आणि नोंदणी अधिनियम १८६० अन्वये पंजीकृत असलेल्या इच्छुक संस्थांकडून शैक्षणिक वर्ष २०१३-१४ करिता महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक सुविधा आणि साधनसामग्री प्रत्यक्षात उपलब्ध आहे. अशा संस्थांनी खालील नमूद विहित कालावधीत अर्ज करण्याकरिता व अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्य़ाच्या जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, रायगड-अलिबाग (दू. क्र. ०२१४१-२२५१०३) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. सर्व गटातील अभ्यासक्रमासाठी माहितीपुस्तिकेसह विहित अर्जाची किंमत रु. ५००/- आहे. तसेच अभ्यासक्रमाच्या एका तुकडीसाठी मान्यता प्रक्रिया शुल्क गटनिहाय वेगवेगळे असून त्याचा तपशील अर्जासोबत माहितीपुस्तिकेत देण्यात आलेला आहे. संबंधित अर्ज व माहितीपुस्तिका मंडळाच्या संकेतस्थळावर (वेबसाइट- ६६६.े२ु५ी.ॠ५.्रल्ल) उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी इच्छुक
महाराष्ट्र राज्यातील मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० आणि नोंदणी अधिनियम १८६० अन्वये पंजीकृत असलेल्या इच्छुक संस्थांकडून शैक्षणिक वर्ष २०१३-१४ करिता महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक सुविधा आणि साधनसामग्री प्रत्यक्षात उपलब्ध आहे.
First published on: 07-12-2012 at 05:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Willing to start certificate sylabus