“सहावी जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी भाजपाने घोडेबाजार मांडला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विधानसभा सदस्य कॉ. विनोद निकोले या घोडेबाजारापासून कटाक्षाने दूर असून ते या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील”., असे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी सांगितले.
तसेच, “२०१४ पासून हा पक्ष सतत महागाई कमी करण्याच्या, बेरोजगारांना रोजगार देण्याच्या, शेतीमालाला उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याच्या वल्गना करत आला आहे. त्यापैकी एकही आश्वासन पुरे न करता उलट भाजपाच्या केंद्र सरकारने आपल्या लाडक्या कॉर्पोरेट भांडवलदारांच्या संपत्तीत अमाप भर टाकली आहे. जनतेच्या मालकीची सर्व आर्थिक क्षेत्रे कवडीमोलाने हे सरकार त्यांना विकत आहे. हा सर्वात मोठा देशद्रोह आहे. महागाईने त्रस्त झालेल्या कामगार, शेतकरी, शेतमजूर, युवक, विद्यार्थी आणि महिलांच्या दुर्दशेस केंद्रातील भाजपा सरकारच जबाबदार आहे. कोव्हिड बंधनांचा लाभ उठवत शेतकरीविरोधी तीन कृषी कायदे आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून कामगारांनी लढून मिळवलेले हक्क पायदळी तुडवणाऱ्या चार श्रमसंहिता मोदी सरकारने लादल्या. ” असं डॉ. उदय नारकर म्हणाले.
राज्यसभा निवडणूक: माकपचे आमदार विनोद निकोले शिवसेनेला करणार मतदान
या सर्व कारणांसाठी भाजपाला धडा शिकवण्यासाठी या राज्यसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीने महाविकास आघाडीच्या उमेदवारांस पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही नारकर यांनी स्पष्ट केले.