सिंचन श्वेतपत्रिकेचा कोणताही अभ्यास न करता विरोधक आक्षेप नोंदवीत असून हे आश्चर्यकारक असल्याचे मत सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांबाबत ते म्हणाले की, भुजबळांच्या विरोधात म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळते. भुजबळ कुटुंबीयांनी देशात व परदेशात जे काही व्यवसाय सुरू केले, ते रीतसर सर्व कायदेशीर पूर्तता करून केले आहेत. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी व्यवसाय करू नये, असा कोणताही नियम नाही. गेल्या तीन वर्षांत अचानक संपत्ती वाढल्याचे जे सोमय्या सांगत आहेत, त्यात तथ्य नाही. समीर व पंकज भुजबळ यांनी घेतलेल्या जमिनी वा फार्म हाऊस कित्येक वर्षांपूर्वीच्या आहेत. आमच्या व्यवसायाविषयी सोमय्या यांनी वेगवेगळ्या संस्थांकडे तक्रारी केल्या आहेत. त्याबाबत संबंधित यंत्रणेकडून माहिती मिळू शकेल.   

Story img Loader