अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानं ओळखलं आहे. दाभोलकरांच्या खुनाचा आरोप असलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर यांना या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखलं आहे. अंदुरे आणि कळस्कर या दोघांनी दाभोलकरांवर गोळीबार केला आणि ते पळून गेल्याचं या साक्षीदाराने सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळच्या सुमारास गोळ्या घालून त्यांची हत्या झाल्याची घटना घडली. त्यावेळी त्या पुलावर साफ सफाई करणारा एक पुरुष आणि महिला पुलाच्या दुभाजकावर बसले होते. त्यावेळी तेथील एका झाडावर माकड आलं आणि कावळ्यांचा आवाज देखील आला. साक्षीदार तिकडे पाहत असताना, एका व्यक्तीला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एकाला गोळ्या झाडल्या. त्यानंतर ती व्यक्ती काही क्षणात खाली पडली. तेथून हल्लेखोर जवळच असलेल्या पोलीस चौकीच्या बाजूला पळाले. त्यानंतर दुचाकीवरून पसार झाले. या घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या,व्यक्तीला पाहिले. त्यानंतर आम्ही आमच्या साफसफाई कामासाठी निघून गेलो, अंदुरे आणि कळस्कर यांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे साक्षीदाराने न्यायालयामध्ये सांगितले.

आता पुढील सुनावणी 23 मार्च रोजी होणार आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. तसेच विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी तर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कुटुंबीयांच्या वतीने ॲड.ओंकार नेवगी यांनी कामकाज पाहिले आहे. बचाव पक्षाकडून विरेंद्र इचलकरंजीकर यांनी काम पाहिले

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Witness identified 2 murderers of narendra dabholkar murder case vsk 98 svk