शेगाव येथील शासकीय निवास शाळेतील विद्यार्थिनींच्या विषबाधा प्रकरणी संबंधित महिला कंत्राटदारास शेगाव पोलिसांनी आज सकाळी अटक केली. प्रतिभा खिल्लारे (३६, रा. रेल्वेस्टेशजवळ, खामगाव) असे अटक  करण्यात आलेल्या महिला कंत्राटदाराचे नाव आहे.  शेगाव पोलिसांनी त्यांना राहत्या घरातून आज अटक केली. त्यांच्याविरुध्द अन्नभेसळ प्रतिबंधक सुरक्षा कायद्याच्या कलम ५६ व ५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. काल रात्री या निवासी शाळेतील विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याचे उघड झाले. यात ७३ विद्यार्थिनींना शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात, तर प्रकृती गंभीर असलेल्या दोन विद्यार्थिनींना अकोला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Story img Loader