शेगाव येथील शासकीय निवास शाळेतील विद्यार्थिनींच्या विषबाधा प्रकरणी संबंधित महिला कंत्राटदारास शेगाव पोलिसांनी आज सकाळी अटक केली. प्रतिभा खिल्लारे (३६, रा. रेल्वेस्टेशजवळ, खामगाव) असे अटक करण्यात आलेल्या महिला कंत्राटदाराचे नाव आहे. शेगाव पोलिसांनी त्यांना राहत्या घरातून आज अटक केली. त्यांच्याविरुध्द अन्नभेसळ प्रतिबंधक सुरक्षा कायद्याच्या कलम ५६ व ५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. काल रात्री या निवासी शाळेतील विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याचे उघड झाले. यात ७३ विद्यार्थिनींना शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात, तर प्रकृती गंभीर असलेल्या दोन विद्यार्थिनींना अकोला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा