Walmik Karad Charged Under MACOCA : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्याविरुद्ध महाराष्ट्र सीआयडीने मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) गुन्हा दाखल केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून आणि विविध राजकीय पक्षांकडून सतत दबाव येत असल्याने महाराष्ट्र सरकारने सीआयडीला वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

परळीमध्ये तणाव

दरम्यान वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर परळीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कराडच्या समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे. आज केज न्यायालयात वाल्मिक कारडवर आरोप असलेल्या खंडणी प्रकरणी सुनावणी होती. त्यापूर्वी सकाळपासून परळीमध्ये कराडच्या कुटुंबीयांसह समर्थकांनी परळी बंदची हाक दिली होती. इतकेच नव्हे तर वाल्मिक कराडची आईसह कुटुंहबीयांनी परळीत ठिय्या आंदोलन केले होते. तसेच त्याच्या समर्थकांनी पोलीस ठाण्याचा बाहेर आंदोलन सुरू केले आहे.

तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न

परळीमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थकांचे आंदोलन सुरू असताना एका तरुणीने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्यांनी या तरुणीला रोखले. यावेळी या तरुणीसह इतरांनी वाल्मिक कराडच्या बाजूने घोषणाबाजी केली.

वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केल्यानंतर त्याला न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज ती कोठडी संपणार असल्याने या प्रकरणी बीड जिल्ह्यातील केज न्यायालयात सुनावणी होती. यावेळी न्यायालयाने कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली असून, त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती यावेळी न्यायालयाने फेटाळून लावली.

विरोधकांसह सत्ताधारीही कराड विरोधात आक्रमक

दरम्यान काल संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून कराड याच्यावर खून आणि मकोका अंतर्गत गुन्हे दाखल न केल्यास उडी मारण्याची धमकी दिली होती. याचबरोबर संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी कराड हाच हत्येतील प्रमुख आरोपी असल्याचा आरोप केला आहे. देशमुख कुटुंबाव्यतिरिक्त, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातील नेत्यांनीही कराड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती.