सावंतवाडी : मालवण येथे भाग्यश्वरी गोवेकर (पूर्वाश्रमीची प्रीती केळुस्कर) या महिलेवर तिच्या पहिल्या पतीने पेट्रोल ओतून बुधवारी जाळल्याने ती काल रात्री मृत्यू पावली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर संतप्त बनलेल्या मालवणातील सर्वपक्षीय महिलांनी आक्रमक पवित्रा घेत आज मोर्चा काढत मालवण पोलीस स्थानक व तहसील कार्यालयावर जमाव करत पोलिसांना निवेदन सादर करून या प्रकरणतील आरोपी असणारा त्या मृत महिलेचा पहिला पती सुशांत गोवेकर याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.

या प्रकरणी मयत महिलेचा पती सुशांत गोवेकर याला जामीन मिळू नये, कोणत्याही वकिलाने त्याचे वकीलपत्र घेऊ नये, या आरोपीचे कृत्य अत्यंत घृणास्पद असून हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून त्याला फाशीची शिक्षा व्हावी, अशी आग्रही मागणी महिलांनी केली. तसेच हा आरोपी जामीनावर सुटल्यास आम्ही महिला मिळून त्याला जाळून टाकू, असा संतप्त इशारा महिलांनी दिला.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
army man killed his wife for immoral relationship and dead body throw in river
विवाहित सैनिकाचा तरुणीवर जडला जीव… पत्नी अडथळा ठरत असल्याने थेट नदीत…
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
Murder of woman in Hadapsar area body was kept in bed compartment
हडपसर भागात महिलेचा खून, मृतदेह पलंगातील कप्यात ठेवल्याचे उघड
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू

आणखी वाचा-Sanjay Raut : अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी, १५ दिवसांची शिक्षा; भाजपाची पहिली प्रतिक्रिया, बावनकुळे म्हणाले “त्यांनी आता…”

मालवण शहरातील बसस्थानक समोरील एका डायग्नोस्टिक लॅबमध्ये काम करणाऱ्या भाग्यश्वरी गोवेकर पूर्वाश्रमीची प्रीती केळुसकर (वय-३५) या विवाहितेवर तिचा पहिला पती सुशांत गोवेकर याने पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना काल बुधवारी दुपारी घडली. या घटनेमुळे मालवण शहरात एकच खळबळ उडाली होती. गंभीररित्या भाजलेल्या प्रीती यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला.

दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद आज उमटले मालवण शहरातील सर्वपक्षीय महिलांनी एकत्रित येत मोर्चा काढत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी पल्लवी तारी, शितल बांदेकर, अमृता वाळके, महिमा मयेकर, शिल्पा खोत, डॉ मालविका झाट्ये, शर्वरी पाटकर, पूजा वेरलकर, अन्वेषा आचरेकर, नीनाक्षी मेतर, अंजना सामंत, विद्या फर्नांडिस, नयना पोयेकर, रश्मी परुळेकर, सोनाली पाटकर, ममता तळगावकर, प्राची माणगावकर, रेश्मा शिंदे, रूपा कुडाळकर, दिव्या कोचरेकर, प्रतिमा भोजने यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.