ऑफिसच्या बॉसबरोबर बोलताना थोडं तारतम्य बाळगले पाहिजे असा सल्ला अनेक ज्येष्ठ कर्मचारी देत असतात. कारण बोलताना केलेली एक लहानशी चूकही तुमच्या करियरच्या दृष्टीने भारी पडू शकते. यात अनेकदा तुमची नोकरी जाण्याची शक्यता असते. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जसे की, व्हॉट्सअप, फेसबुक किंवा मेसेंजरवरून बॉससह बोलताना खूप काळजी घेतली पाहिजे अन्यथा अर्थाचा अनर्थ होत भलतेच काहीतरी होऊन बसते. याचीच प्रचिती देणारा एक प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. एका महिला कर्मचाऱ्याने सुट्टीसाठी बॉसला असे काही मेसेज केले जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, धक्कादायक बाब म्हणजे हे मेसेज बॉसच्या पत्नीने वाचले. यामुळे महिला कर्मचाऱ्याने केलेल्या मेसेजमुळे चुकी नसतानाही आता बॉसची बायकोसमोर गोची झाली आहे. महिला कर्मचारी आणि बॉसमधील या संभाषणाचा स्क्रीन शॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हे मेसेज तुम्ही देखील वाचा आणि बॉससोबत बोलताना तुमच्याकडून या चुका होणार नाहीत याची काळजी घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा स्क्रीनशॉट एका ट्विटर युजरने शेअर केला आहे. वरवर पाहता हे मेसेज तुम्हाला सामान्य वाटतील, पण तर तुम्ही ते बारकाईने वाचले तर तुम्हाला त्यात महिला कर्मचाऱ्याने काय घोळ घातला हे लक्षात येईल. तर त्याचं झालं असं की, एका महिला कर्मचाऱ्याने बॉसला सर्वप्रथम हाय बॉस असा मेसेज केला, यावर बॉसने येस असा रिप्लाय केला, मात्र यानंतर कर्मचाऱ्याने थेट im Pregnant असा थेट मेसेज केला. ज्यावर बॉसने प्रश्नचिन्हे पाठवली. यानंतर महिला कर्मचाऱ्याने माझ्या बॉयफ्रेंडसह बोलण्यासाठी काही दिवस सुट्टी हवी आहे, तर प्लीज माझी सुट्टी मंजुर करा असा मेसेज केला. यानंतर बॉसने लिहिले की, मला आता माझ्या बायकोशी याबाबत चर्चा करावी लागेल, कारण हे सगळे मेसेज पहिले तिने वाचले. आणि हो, हे सगळं एका मेसेजमध्ये का लिहिले नाहीस. असा सवाल केला. महिला कर्मचाऱ्याच्या या मेसेजमुळे बॉस मात्र पुरता फसला आहे,

वाच बॉस आणि महिला कर्मचाऱ्यामधील चॅट

बॉस आणि महिला कर्मचाऱ्यामधील चॅट होतेय व्हायरल

बॉस आणि कर्मचाऱ्यामधील या चॅटचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत ३ लाखांहून नेटकऱ्यांनी तो वाचला असून त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी बॉसची खिल्ली उडवायला सुरुवात केली तर काही युजर्सनी असे मेसेज बायकोसमोर वाचू नयेत असे सांगितले.

पण कोणत्याही कर्मचाऱ्याने बॉससोबत बोलताना थोडं भान ठेवून बोलायला पाहिजे, मेसेज पाठवताना आपण काय मेसेज टाइप केला आहे, त्याचा अर्थ नीट आहे ना हे एकदा वाचलं पाहिजे. स्पेलिंग मिस्टेक आणि अर्थाचा अनर्थ होईल अशी वाक्यरचना टाळली पाहिजे, असे सल्ले अनेकांनी दिले आहेत. तुम्ही देखील या चूका करू नका.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman employee ask leave to boss on whatsapp chat viral on social media sjr