रत्नागिरी  :  रत्नागिरी शहराजवळील नाचणे येथील वृध्दाची दोघा संशयितांनी ६१ लाख १९ हजार ८० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दोघांनी मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून तसेच पोलीस अधिकारी  असल्याचे सांगून  ऑनलाईन फसवणूक केली.  ही घटना शनिवार ३१ डिसेंबर रोजी सकाळी १० ते शुक्रवार २७ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता या कालावधीत घडल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  साई प्रसाद पुरुषोत्तम गावडे (वय ६५) राहणार  साई छाया सदन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाचणे, रत्नागिरी यांनी  शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयितांपैकी एकाने फिर्यादी यांना फोन करुन मी मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याचे सांगितले.  फिर्यादींना तुमचे सिमकार्ड बंद होणार असल्याची भिती देखील घातली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रारीकरता कॉल फॉरवर्ड करत असल्याचा बहाणा करत दुसऱ्या संशयिताने फिर्यादीशी २१ डिसेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीत व्हॉटसअॅपवरुन हेमराज कोळी नावाचा पोलीस अधिकारी असल्याची सांगत संपर्क साधला. त्यानंतर दोन्ही संशयितांनी संगनमताने फिर्यादीला तुमकच्या बँक खात्यातून २ कोटी रुपयांचा मनी लॉड्रिंगचा व्यवहार झाला असल्याची भिती घालून त्यांच्या बँक खात्यातून ६१ लाख १९ हजार ८० रुपये काढून घेत ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८, (४), ३१९ (२) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी), ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

What Suresh Dhas Said About Prajakta Mali?
Suresh Dhas : प्राजक्ता माळीबाबत प्रश्न विचारताच सुरेश धस म्हणाले, “जे काही…”
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
shashank ketkar will become father for second time
शशांक केतकर दुसऱ्यांदा बाबा होणार! नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिली गुडन्यूज, पत्नी व मुलासह केलं खास फोटोशूट
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक मालकाने सांगितली नेमकी परिस्थिती
Kannada film director Guru Prasad Found Dead
कुजलेल्या अवस्थेत आढळला प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मृतदेह, दुर्गंधीमुळे घटना उघडकीस, पोलिसांची प्रतिक्रिया आली समोर
Anant Madhavan
सेटवर लागलेली आग, ५२ जणांचा मृत्यू आणि प्रसिद्ध अभिनेत्यावर ७३ सर्जरी; अनंत माधवन आठवण सांगत म्हणाले, “ती रात्र…”
baba Vanga Predictions 2025 astrology in marathi
Baba Vangas Predictions 2025 : २०२५ मध्ये ‘या’ पाच राशी होणार अफाट श्रीमंत! नवीन वर्षात प्रचंड धनलाभाची संधी; बाबा वेंगांची भविष्यवाणी
What Amit Thackeray Said About Raj Thackeray and Uddhav Thackeray?
Amit Thackeray : “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुळीच एकत्र येऊ नये, कारण..”; अमित ठाकरे काय म्हणाले?
Story img Loader