सांगली : आर्थिक वादातून एका महिलेचे अपहरण करून बेदम मारहाण करीत दीड कोटींची खंडणी मागण्याचा प्रकार सांगलीत मध्यरात्री घडला असून पोलीसांनी या प्रकरणी सर्व ११ संशयितांना अटक केली असून न्यायालयाने या सर्वांना ३० मेअखेर पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अभिजित पाटील (वय ३०), श्रीकांत कोकळे (वय ४०) आणि विशाल शिंदे (वय ३९) हे तिघे अन्य आठ जणांना घेउन बुधवारी रात्री साडेआठ वाजणेच्या सुमारास आम्ही स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस असल्याचे सांगत संजोग कॉलनीतील नंदादिप बंगल्यात शिरले. या ठिकाणी येउन स्वाती संजय पाटील (वय ५८) यांच्याशी आर्थिक कारणावरून वाद घातला. यानंतर महिलेला मोटारीतून घेउन मिरजेत नेले. मिरजेत नेउन बेदम मारहाण करण्यात आली. तसेच महिलेची सुटका करण्यासाठी दीड कोटींची खंडणीही मागण्यात आली. या प्रकरणी शिवराज पाटील यांनी गुरूवारी पहाटे शहर पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली.

याप्रकरणी पोलिसांनी अभिजित दिलीप पाटील ( रा. तासगाव), श्रीकांत शिवाजी कोकळे ( रा. उमदी, ता. जत), विशाल गोविंद शिंदे ( रा. कासार गल्ली, तासगाव), अतुल अशोक काळे (वय २९, रा. गणपती पेठ, सांगली), अमर गोरख खोत (वय ३६, रा. संजयनगर, सांगली), श्रीकांत आप्पासो गायकवाड (वय ३०, रा. तासगाव), मनोज नारायण चव्हाण (वय ३२, रा. कोल्हापूर रोड, सांगली), सुशांत नंदकुमार पैलवान (वय ३२, रा. तासगाव), सुयोगराज चंद्रकांत वेल्लार (वय ३७, रा. स्टँडजवळ, सांगली), आरीफमहमद बाबासाहेब आत्तार (वय ३८, रा. शाहुनगर, जयसिंगपूर), शीतल गोरख भजबळे (वय ३९, रा. संजयनगर, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

life sentence prisoner escapes from yerawada jail pune
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
kidnap of uncle of MLA Yogesh Tilekar, Yogesh Tilekar uncle, Yogesh Tilekar latest news,
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण, पोलिसांकडून अपहरणकर्त्यांचा शोध
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत
senior citizen cheated , Crime case against cyber thieves,
पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी सर्व संशयितांना गुरूवारी सकाळी अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार (एमएच १० डीजी ४३०२), स्कोडा (एमएच ०८ झेड ३८३८) जप्त केली आहे. यात वापरलेली आणखी एक एमजी हेक्टर कारचा पोलिस शोध घेत आहेत. सांगली शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या मागर्दशर्नाखाली सहायक निरीक्षक समीर ढोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयितामध्ये एका मोठ्या राजकीय नेत्याचा स्वीय सहायक म्हणून गेल्या वर्षापर्यंत कार्यरत होता, तर दोघे जण शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या सर्व ११ संशयितांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना ३० मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे निरीक्षक श्री. गायकवाड यांनी सांगितले.

Story img Loader