लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सातारा : विडणी (ता. फलटण) परिसरातील उसाच्या शेतात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाशेजारी गुलाल, कुंकू, दिव्याची वात, नारळ, काळी बाहुली आढळून आल्याने अंधश्रद्धेतून हा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.

आणखी वाचा-Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांचं वक्तव्य चर्चेत, “…आता कॉलर उडवण्याचे दिवसही गेले राव”

उसाच्या शेतात निर्मनुष्य ठिकाणी काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने महिलेचा खून करून मृतदेह उसाच्या शेतात टाकला आहे. काल तो आढळल्यानंतर हा खुनाचा प्रकार उघडकीस आला. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना केल्या. या ठिकाणी श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथक दाखल झाले. जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. मृतदेहाशेजारी गुलाल, कुंकू, दिव्याची वात, नारळ, काळी बाहुली आढळून आल्याने अंधश्रद्धेतून हा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.