गेल्या ४ डिसेंबरला गडचिरोली पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत नक्षलवादी नेता नर्मदाक्का व भास्कर यांच्यासह सहा नक्षलवादी ठार झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. नक्षलवाद्यांच्या या मृत्यूला महाराष्ट्र, तसेच छत्तीसगड पोलिसांनी दुजोरा दिला आहे, तर नक्षलवाद्यांनी मात्र मौन बाळगले आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेली नर्मदा मूळची आंध्रप्रदेशातील असून गेल्या ३० वर्षांंपासून सक्रीय व या चळवळीची संस्थापक सदस्य होती. मृत्यूसमयी ती ६० वर्षांंची होती. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीची सदस्य असलेली नर्मदा गेल्या काही वर्षांंपासून दक्षिण गडचिरोलीत वास्तव्याला होती. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेली नर्मदा मूळची आंध्रप्रदेशातील असून ती या चळवळीची संस्थापक सदस्य होती. दक्षिण गडचिरोलीत सक्रीय असलेल्या शेखरच्या आत्मसमर्पणानंतर भास्करने या भागाचा विभागीय सचिव म्हणून नुकतीच जबाबदारी सांभाळली होती. चळवळीतील दोन बडे नेते, अशी या दोघांची ओळख होती. आता हे दोघेही ठार झाल्याला महाराष्ट्र व छत्तीसगडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी, तसेच गुप्तचर यंत्रणांनीही दुजोरा दिला आहे. सी-६० च्या जवानांचे हे मोठे यश मानले जात असले तरी या घटनेमुळे हादरलेल्या नक्षलवाद्यांनी मात्र अद्याप मौनच पत्करलेले आहे.
चकमकीत ठार झालेली महिला नक्षलवादी नर्मदाक्काच
गेल्या ४ डिसेंबरला गडचिरोली पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत नक्षलवादी नेता नर्मदाक्का व भास्कर यांच्यासह सहा नक्षलवादी ठार झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. नक्षलवाद्यांच्या या मृत्यूला महाराष्ट्र, तसेच छत्तीसगड पोलिसांनी दुजोरा दिला आहे, तर नक्षलवाद्यांनी मात्र मौन बाळगले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-12-2012 at 01:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman naxal killed in encounter in maharashtra