लग्नाचे आमिष दाखवून पोलीस शिपायाने आपल्याच सहकारी महिला पोलिसावर दोन वष्रे बलात्कार केला. या प्रकरणी या पीडित महिलेने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपी नागेश पोपट गावडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
पीडित महिला पोलीस शिपाई २०१२मध्ये रायगड पोलीस दलामध्ये शिपाई पदावर भरती झाली. या भारतीच्या कालावधीत त्यांना प्रशिक्षण देणारे नागेश पोपट गावडे यांच्याशी तिची ओळख झाली. तिला मदत करण्याच्या बहाण्याने गावडे याने तिच्याशी जवळीक साधली. लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. या वेळी त्याने चित्रीकरण करून ते मोबाइलमध्ये ठेवले. बदनामी करण्याची धमकी देऊ लागला. सातारा येथे गावडे याने या पीडित महिलेला मारहाणही केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jun 2014 रोजी प्रकाशित
महिला पोलिसावर पोलिसाचाच बलात्कार
लग्नाचे आमिष दाखवून पोलीस शिपायाने आपल्याच सहकारी महिला पोलिसावर दोन वष्रे बलात्कार केला. या प्रकरणी या पीडित महिलेने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली
First published on: 29-06-2014 at 03:17 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman police constable raped by colleague police constable