लग्नाचे खोटे आमिष देऊन महिलेवर बलात्कार करत तिला धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडल्याची घटना लातूरमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अराफत लायक खान (३२) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचे आणि पीडितेचे एकाच शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये दुकान आहे. तेथेच दोघांची एकमेकांशी ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. आरोपीने ऑक्टोबर 2018 मध्ये तिला लग्नाची मागणी घातली आणि तिला धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडले. तसेच आरोपीने पीडितेला त्याच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मात्र, त्यानंतर आरोपीने दुसऱ्या महिलेशी लग्न केले. पीडितेने आरोपीच्या घरी जाऊन जाब विचारला तेव्हा आरोपीच्या कुटुंबियांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्यांच्याविरोधात भादंविच्या कलम ३७६ (बलात्कार) आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा – औरंगाबादचे संभाजीनगर होणारच! नामांतराला स्थगिती नाही; फडणवीसांनी केलं स्पष्ट