राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवी दिल्लीच्या कार्यालयात हा धमकीचा फोन आलेला आहे. पुढच्या २४ तासांत रुपाली चाकणकर यांना जीवे मारु, असा धमकीचा फोन कार्यालयात आला होता. आरोपी हा अहमदनगरचा असून पुढील तपास सुरू आहे.
या अगोदरही आला होता धमकीचा फोन
या आगोदरही दोन वेळा चाकणकर यांना धमकीचा फोन आला होता. तुमचा कार्यक्रम करू अशी भाषा धमकी देणाऱ्या व्यक्तीने वापरली होती. तर एका व्यक्तीने चाकणकर यांचे पुण्यातील सिंहगड रोडवरील धायरी येथील कार्यालय पेटवून देण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
कोण आहेत रुपाली चाकणकर?
राज्य सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रमुख रुपाली चाकणकर यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. भाजपच्या माजी प्रमुख विजया रहाटकर यांनी ४ फेब्रुवारी २०२० रोजी राजीनामा दिल्याने अध्यक्षपद रिक्त होते.