आठ दिवसांपासून तापाने हैराण झालेल्या वटकळी (तालुका सेनगाव) येथील संगीता रमेश िशदे (वय २६) या महिलेचा नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. डेंग्यूच्या आजाराने हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला.
संगीता िशदे या महिलेच्या अंगात ८ दिवसांपासून ताप होता. तिला उपचारासाठी वाशिम जिल्ह्यातील रिसोड, िहगोली व नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. १६ सप्टेंबरला रात्री उपचार चालू असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर आरोग्य विभागाने वटकळी गावात डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना हाती घेतल्या. स्वच्छतेसह गटारांची साफसफाई केली जात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पोले यांनी सांगितले.
जिल्ह्यात सुरुवातीला िपपळदरी येथील शाळकरी विद्यार्थ्यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. नंतर डेंग्यूने अनेक ठिकाणी पाय पसरले. औंढा नागनाथ, वसमतनंतर आता िहगोलीत दोन रुग्ण दाखल झाले आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील दुधाळा येथील बाबुराव देवराव गारोळे (वय ३०), तर िहगोली शहरातील संजय घोडजकर यांनाही डेंग्यूने ग्रासले आहे. या रुग्णांवर सध्या उपचार चालू आहेत.
कळमनुरी तालुक्यातील डिग्रस (बु.), रामेश्वर तांडा व परिसरात डेंग्यूच्या आजाराचे रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होऊ लागले आहेत. दत्तराव दिगंबर करपे (वय २६) यास डेंग्यूची लागण झाल्याने नांदेड येथील रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले. मात्र, आरोग्य विभाग डेंग्यूच्या आजाराबाबत अनभिज्ञच असल्याचे चित्र आहे. डिग्रस बु. येथील आरोग्य उपकेंद्र कर्मचारी नसल्याने बंद आहे. उपकेंद्रात ४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती कागदोपत्री असली, तरी प्रत्यक्षात एकही कर्मचारी हजर राहत नसल्याच्या तक्रारी आहेत.

Story img Loader