महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत एक गुण मिळालेल्या महिला मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरल्या असून खुल्या प्रवर्गापेक्षाही मागासवर्गीयांचा ‘कट ऑफ’ जास्त आहे, हे विशेष. केवळ महिलांचाच ‘कट ऑफ’ नाही, तर इतर सर्वच प्रवर्गाचा कट ऑफ दिवसेंदिवस निचांक गाठत चालला असून उद्या, केवळ आयोगाच्या परीक्षेचा अर्ज भरणारा उमेदवारही उत्तीर्ण होईल की काय, अशी शंका या निमित्ताने निर्माण झाली आहे. आयोगातर्फे घेतली जाणारी परीक्षा विद्यार्थ्यांना समजत नाही की उमेदवारच निर्बुद्ध आहेत, असे महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आकडेवारीवरून वाटू लागते. वर्ग ‘ब’ गटातील अराजपत्रित अधिकारी ५० टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण होत असताना वर्ग ‘अ’ गटातील अधिकाऱ्याला खुल्या प्रवर्गात एक गुण जरी मिळाला तरी उत्तीर्ण, हा एमपीएससीचा निकष प्रथम हास्यास्पद वाटत असला तरी तो चिंतनीय आहे.
आयोगातर्फे २७ एप्रिलला महाराष्ट्र वनसेवेंतर्गत सहायक वनसंरक्षक आणि वनक्षेत्रपाल या अनुक्रमे १० आणि २७२ पदांसाठी पूर्व परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्रातील औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या. त्याचा निकाल २० ऑगस्टला लावला. त्यानंतर २१ ऑगस्टला आयोगाने मुख्य परीक्षेसंबंधीची घोषणा करताना मुख्य परीक्षेला निवडण्यात येणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण १:१० (एका पदास दहा उमेदवार) असे घोषित केले होते. त्या विरोधात उमेदवार न्यायालयात गेले. इतर परीक्षांना १:२० असे प्रमाण असताना याच परीक्षेत १:१० असा नियम का, असे प्रश्न उमेदवारांकडून उपस्थित करण्यात आले.
न्यायालयाने ते मान्य करून १:२० हेच गुणोत्तर योग्य ठरवले. त्यानुसार आयोगाला एका पदामागे २० विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी निवडणे भाग पडले. मात्र, याचा परिणाम असा झाला की, आयोगाचा कट ऑफ एकवर आला. म्हणजे, खुल्या प्रवर्गातील महिलेला किंवा क्रीडापटूंना एक गुण असला तरी ते मुख्य परीक्षेला पात्र ठरले आहेत. आश्चर्य म्हणजे, अनुसूचित जाती प्रवर्गात महिलांचा कट ऑफ १७, अनुसूचित जमातीत १२, डीटी (अ)मध्ये २४, एनटी (ब) मध्ये ९, विशेष मागास वर्गासाठी (एसबीसी) १९, एनटी (सी) २४ आणि इतर मागासवर्गासाठी २१ आहे.

आयोगाचे सुधारित अभ्यासक्रमानुसार ही परीक्षा इंग्रजीतून घ्यायचे ठरले. मात्र, घोषणेत ते नमूद करणे राहून गेले. या तांत्रिक त्रुटीचा आधार घेत काही विद्यार्थी महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे (मॅट) गेले. मॅटचा सन्मान करून विशेष बाब म्हणून आम्ही केवळ याच परीक्षेसाठी एका पदास २० उमेदवार मुख्य परीक्षेसाठी निवडले आहेत. त्यामुळेच ‘कट ऑफ’ एकवर आला आहे,  असे अध्यक्ष विठ्ठल मोरे म्हणाले,

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
11 thousand 500 students passed ca final examination conducted in November 2024 Mumbai
‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ११ हजार ५०० विद्यार्थी ‘सीए’ म्हणून पात्र
Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
Indian Women On Course For Clean Sweep Against West Indies
भारताचे निर्भेळ यशाचे लक्ष्य; वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना आज
High Court rejects plea for abortion in 31st week
एकतिसाव्या आठवड्यात गर्भापाताची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
Story img Loader