Sharad Pawar in Markadwadi : माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याच्या निर्णयाबद्दल माळशिरसचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यासह इतरही १०० हून अधिक ग्रामस्थांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला, विरोधी पक्ष ईव्हीएमविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या तयारीत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) सर्वेसर्वा शरद पवार मारकडवाडीत पोहोचले असून त्यांनी तिथून लाँग मार्चला सुरुवात केली. मारकडवाडीत शरद पवारांनी ग्रामस्थांना संबोधन केलं. तसंच, शरद पवारांसमोरच उपस्थित महिलांनी शासनाविरोधात एल्गार पुकारला. काही महिलांनी उत्स्फूर्त भाषणं करून शासनाला कोंडीत पकडलं आहे.

एक महिला म्हणाली, “आमचं मतदान व्हायचं होतं ते झालं नाही. आमच्यावर शासनाने अन्याय केला. बॅलेट पेपरवर मतदानही करू दिलं नाही. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला. पोलिसांनी दमदाटी करून गुन्हा दाखल करू असं पोलीस म्हणत होते. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे.”

ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
devendra fadnavis gadchiroli guardian minister
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना हवंय ‘या’ जिल्ह्याचं पालकमंत्रीपद; मित्रपक्षांनी सहमती दिल्यास जबाबदारी स्वीकारणार!

हेही वाचा >> उत्तम जानकर यांच्यावर मारकडवाडी प्रकरणी गुन्हा

लाडक्या बहिणीचा मुद्दा समोर करून…

दुसऱ्या महिलेने कवितेच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांच्या नावाचा गजर करत ईव्हीएमविरोधात न्याय मागितला. “लाडक्या बहिणीचा मुद्दा समोर करून तुम्ही आमच्या अहिल्येचा अपमान करत आहात. तुम्ही स्वःच्या हिमतीवर अनेकांना जगवलं होतं”, असं म्हणत सदर महिला पुढे म्हणाली, “मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीच्या देशभर पेटला पाहिजे.”

फक्त महिलाच नव्हे तर शाळकरी मुलीनेही ईव्हीएमविरोधात एल्गार पुकारला. ती म्हणाले, “आमच्या आमदारसाहेबांना जास्त लीड मिळायचं. पण यंदा मिळालं नाही. त्यामुळे या शकंचे निरसन व्हावं म्हणून बॅलेट पेपरवर मतदान करण्याची मागणी केली. पण, आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान करू दिलं नाही. हा आमचा हक्क आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे, ईव्हीएम हटवा, आणि देश वाचवा.”

हेही वाचा >> Sharad Pawar : मी काय चुकीचं केलं? मारकडवाडीतील ग्रामस्थांसमोरच शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल

मारकडवाडीत जाऊन शरद पवार काय म्हणाले?

ईव्हीएम विरोधात आंदोनल उभारणाऱ्या मारकडवाडीच्या ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी आज राष्ट्रवादीने (शरद पवार) कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी शरद पवार म्हणाले, “आज जगात कुठेही ईव्हीएमचा वापर होत नाही. मग भारताच याचा वापर का सुरू आहे. आज तुमच्या गावाने एका वेगळ्या पद्धतीने जायचे ठरवले तर सरकाने तुमच्याविरोधात खटला भरला. माझी तुम्हाला विनंती आहे की, तुमच्यावर दाखल करण्यात आलेल्या खटल्याची सर्व माहिती मला द्या. याबाबतची तक्रार आम्ही राज्याचा निवडणूक आयोग, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे देऊ. हे कशासाठी? तर निवडणूक यंत्रणांचा काळा सोकू नये म्हणून. “

Story img Loader