पुणे : राज्यात येरवडा, मुंबई आणि अकोला येथे महिलांसाठी स्वतंत्र कारागृहे आहेत. या कारागृहांत १३२० महिला कैद्यांना ठेवण्याची क्षमता आहे. मात्र,
सध्या या कारागृहांंत १३४३ कैदी आहेत. त्यापैकी वीस टक्के महिला कैद्यांना शिक्षा झालेली आहे. उर्वरित महिला कैद्यांना अद्याप शिक्षा झालेली नाही.
राज्यात ३१ जिल्हा कारागृहे आहेत. एक खुली वसाहत आहे. १४२ उपकारागृहे आहेत. राज्यातील कारागृहांत ४ हजार ७२५ शिक्षा झालेले पुरुष कैदी आहेत आणि ३० हजार १२५ कच्चे कैदी आहेत.
हेही वाचा – कारागृहात पाळणाघर; ऑर्थर रोड कारागृह परिसरात महिला कैद्यांच्या मुलांसाठी बालवाडी
महिला कैद्यांच्या मुलांसाठी सुविधा
एखाद्या गंभीर गुन्ह्यात अटक केल्यानंतर महिला कैद्याला कारागृहात ठेवण्यात येते. तिच्या लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी कोणी नातेवाईक नसतील तर, कारागृह प्रशासनाला महिला कैद्याच्या मुलांचे संगोपन करावे लागते. नियमानुसार महिला कैदी कारागृहात तिच्या मुलाचा सहा वर्षांपर्यंत सांभाळ करू शकते. मुलाची जबाबदारी स्वीकारण्यास काेणी पुढे आले नाही तर संबंधित मुलाची जबाबदारी बालसंगोपन संस्थेकडे सोपविण्यात येते.