महिलांनी आपले संरक्षण स्वत:च करावयास शिकले पाहिजे. योग्य वेळी पोलिसांची मदत मागितल्यास ती त्यांना देण्यात येईल. त्यामुळे गुन्हेगारीस आळा बसू शकेल, असे मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एस. सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. येथील लाइफ केअर रुग्णालयात महिला दिनानिमित्त नाशिक ब्लड बँकेच्या सहकार्याने आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सूर्यवंशी उपस्थित होते.
या वेळी सूर्यवंशी यांनी महिलांनी उत्तम आरोग्य राखून भविष्यात सभोवतालच्या परिस्थितीबाबत सतर्क राहण्याची सूचना केली. रुग्णालयाचे संचालक डॉ. उमेश मराठे यांनी स्त्रियांनी आपले आरोग्य कसे निरोगी ठेवावे याबाबत माहिती दिली.
डॉ. विजय गवळी यांनी रुग्णांना रक्त देताना योग्य त्या गोष्टींची काळजी घेणे व रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. सूत्रसंचालन दीपक देशमुख यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा