Supriya Sule : रोहित पवार यांच्याबाबत शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. शरद पवार म्हणाले होते की रोहितने कधीही पदाची अपेक्षा केली नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडणून आल्यानंतर रोहितने चांगलं काम केलं. पदाची अपेक्षा केली नाही. रोहितची पहिली पाच वर्षे तुमची सेवा करण्यासाठी आणि पुढची पाच वर्षे महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. याबाबत सुप्रिया सुळेंनीही ( Supriya Sule ) भुवया उंचावणारं वक्तव्य केलं आहे. शरद पवारांचा वारसा रोहित पवार चालवणार असतील तर त्यात मला काय हरकत असेल? असं सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) म्हणाल्या आहेत.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

“रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले किंवा शरद पवारांचा वारसा त्यांनी चालवला तर माझी हरकत असण्याचं कारणच काय? रोहितच का? माझ्या वडिलांचा वारसा कुणीही चालवू शकतं.” असं उत्तर सुप्रिया सुळेंनी दिलं आहे. कर्जत जामखेडमध्ये शरद पवारांनी रोहित पवारांविषयी जे वक्तव्य केलं त्याबाबत विचारलं असता सुप्रिया सुळेंनी ( Supriya Sule ) हे उत्तर दिलं आहे.

Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Sharad Pawar On Ajit Pawar
Sharad Pawar : शरद पवारांकडून अजित पवारांची पुन्हा नक्कल अन् सभेत एकच हशा; म्हणाले, “काही माणसं…”
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : “मोदी ४०० हून अधिक जागांची मागणी करत होते कारण..”, शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’

हे पण वाचा- Supriya Sule : “दीड ते दोन महिन्यांत आपल्याच विचारांचं सरकार…”, सुप्रिया सुळेंचं महत्त्वाचं विधान

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २०२३ मध्ये फुटला

राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष २०२३ मध्ये फुटला. अजित पवार यांनी महायुतीत सहभागी होत शरद पवारांच्या विरोधी भूमिका घेतली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही अजित पवारांनी बहीण सुप्रिया सुळेंच्या विरोधात पत्नी सुनेत्रा यांना उमेदवारी दिली. यानंतर अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर खूप टीकाही झाली. तसंच लोकसभा निवडणुकीत बारामतीकर अजूनही शरद पवारांबरोबरच आहेत हे दिसून आलं. सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) पुन्हा एकदा निवडून आल्या. त्यानंतर काही दिवस गेल्यानंतर अजित पवारांनीही चूक मान्य केली. यानंतर आता विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.

निवडणुकीत काय होणार?

महाविकास आघाडी आणि महायुती या दोहोंनी निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. अशात शरद पवार यांनी रोहित पवारांबाबत जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या, रोहित पवार मुख्यमंत्री होणार का? या चर्चाही रंगल्या होत्या. आता सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांनी माझ्या वडिलांचा वारसा चालवला तरीही माझी काही हरकत नाही असं म्हटलं आहे. याचाच अर्थ शरद पवारांचा वारसा हा आता आगामी काळात रोहित पवार चालवताना दिसतील. तसंच महाविकास आघाडी सरकार आलं तर त्यात रोहित पवार मंत्री असतील असं समजायला हरकत नाही.