World Economic Forum Davos Investment for Maharashtra : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. गुंतवणुकीच्यादृष्टीने हा दौरा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. यादम्यान दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे काल (सोमवार) रात्री उदघाटन झाल्यानंतर आज (मंगळवार) पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने विक्रमी ४ लाख ९९ हजार ३२१ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. यातून सुमारे ९२,२३५ इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. यातील एकच करार ३ लाख कोटींचा असून हा जेएसडब्ल्यू बरोबर करण्यात आला आहे. हा करार स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात करण्यात आला आहे. हा करार महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बूस्ट देणारा असल्याची भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा