जीवनशैली बदलाने चाळिशीच्या आतच आजाराची लक्षणे   

आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे

Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Image of Dr. Manmohan Singh
World On Manmohan Singh Death : “आर्थिक सुधारणांचे शिल्पकार ते अनुत्सुक पंतप्रधान”, मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जागतिक माध्यमांची प्रतिक्रिया
Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
impact of new year resolutions
संकल्पांचे नवे धोरण
Dr. Manmohan Singh passes away at 92
Dr. Manmohan Singh Passes Away : देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, आजचे शासकीय कार्यक्रम रद्द; मनमोहन सिंग यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार!
chatura loksatta marathi news
स्त्री आरोग्य : नववर्षाचा संकल्प; फिट राहा!
How Cold Weather Impacts Men's Sexual Health
हिवाळ्यात पुरुषाच्या लैंगिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञांनी सांगितले, कशी घ्यावी काळजी?

भक्ती बिसुरे, पुणे अतिउच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) हा सर्वसाधारणपणे वयाच्या पन्नाशीनंतर येणारा आजार म्हणून ओळखला जातो. मात्र बदललेल्या हानीकारक जीवनशैलीमुळे गेल्या काही वर्षांत ही व्याधी तरुणांमध्ये वाढत आहे.

अवघ्या चाळिशीतच या आजाराने अधिकाधिक जणांना पछाडले असल्याचे निरीक्षण डॉक्टरांकडून नोंदवण्यात आले आहे.

१७ मे हा  जागतिक अतिउच्च रक्तदाब दिवस (‘वर्ल्ड हायपरटेन्शन डे’) म्हणून ओळखला जातो.  त्यानिमित्ताने डॉक्टरांशी संवाद साधला असता हा आजार ‘तरुण’ होत असल्याची माहिती त्यांनी दिली. एका बाजूला पाश्चिमात्य देशांतील अति उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या आश्चर्यकारकपणे कमी होत असताना दुसऱ्या बाजूला भारतात मात्र या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असलेले दिसून येत आहे. जीवनशैलीमध्ये होत असलेले बदल आणि आयुष्याला आलेला वेग हे यामागील प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

डॉ. प्राची साठे म्हणाल्या की, ताणतणावाची नोकरी, स्वत:चा व्यवसाय किंवा उद्योग असलेल्या चाळिशीच्या आतील व्यक्तींमध्येही हा आजार वाढत असलेला दिसतोय. कायमस्वरूपी औषध घ्यावे लागेल म्हणून हा आजार स्वीकारण्याची रुग्णांची तयारी नसते, मात्र ते धोकादायक आहे. अतिउच्च रक्तदाबाचे निदान झालेल्या रुग्णांनी नियमित रक्तदाब तपासावा, घरच्या घरी रक्तदाब तपासायचे उपकरण विकत घेऊ न ते डॉक्टरांकडून वापरण्यास शिकावे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी जास्त औषधे घ्यावी लागतात, रुग्णांनी स्वत:च्या मनाने ती बंद करू नयेत किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वर्षांनुवर्षे घेत राहू नयेत.

डॉ. आरती शहाडे म्हणाल्या की, अतिउच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधोपचार, आहार आणि व्यायाम ही त्रिसूत्री पाळणे आवश्यक आहे. मीठ, सोडायुक्त थंड पेये आणि पाकिटातील खाद्यपदार्थाचे सेवन करू नये. हृदयविकार, पक्षाघात असे धोके उद्भवत असल्याने रुग्णांनी काळजी घ्यावी.

काय करावे?

उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष केल्यास हृदयविकाराशी संबंधित आजार जडण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्णांनी जीवनशैलीशी निगडित आहार, व्यायाम इत्यादी बदल करणे आवश्यक आहेत. तसेच उपचारांमध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे. सतत ताणतणावात काम करणाऱ्या तरुणांनी ३५ व्या वर्षांनंतर महिन्यातून एकदा रक्तदाब तपासणी केल्यास निदान आणि उपचार योग्यरीत्या होऊ शकतो.

कसा ओळखावा?

वयाच्या पन्नाशीपर्यंत सिस्टोलिक रक्तदाब ११० ते १४० असावा, तर डायास्टोलिक रक्तदाब नव्वदपेक्षा कमी असावा. सिस्टोलिक रक्तदाब १४० पेक्षा जास्त आणि डायास्टोलिक रक्तदाब नव्वदपेक्षा जास्त असेल तर संबंधित व्यक्तीला अतिउच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) असल्याचे निदान केले जाते. तपासणीतून हे समोर येते.

Story img Loader