संदीप आचार्य लोकसत्ता
मुंबई: खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, धकाधकीचे व ताणतणावपूर्ण जीवन, अपुरी झोप अशा चुकीच्या जीवनशैलीमुळे पक्षाघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये, स्ट्रोकमुळे कायमचे अपंगत्व किंवा अचानक मृत्यू ओढावू शकतो. केईएम रूग्णालयांमध्ये दर महिन्याला २४० पेक्षा जास्त स्ट्रोकचे रूग्ण आढळून आले आहेत ज्यामध्ये बहुसंख्य रूग्ण तरुण आहेत.
या परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना केईएम रुग्णालयातील स्ट्रोक युनिट प्रमुख डॉ. नितीन डांगे म्हणतात, जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यामुळे भारतात स्ट्रोकच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. काही वर्षांपासून, ही संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. स्ट्रोकच्या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली असून तरुण वयोगटातील रुग्णांची संख्य अलीकडेच वाढली आहे. जंक फूड तसेच तळलेल्या पदार्थांचे सेवन, बैठी जीवनशैली, धूम्रपान, व्यायामाचा अभाव आणि मधुमेह, उच्च रक्तदाब आणि विस्कळीत लिपिड प्रोफाइल ही स्ट्रोकमागची कारणं आहेत.
हेही वाचा >>>> टाटा-एअरबस प्रकल्प वादावर एकनाथ शिंदेंचं विरोधकांना प्रत्युत्तर; म्हणाले, “राज्यात काहूर माजवणाऱ्यांना…”
स्ट्रोक म्हणजे मेंदूचा झटका आणि हे देशातील अपंगत्वाचे प्रमुख कारण आहे. हे त्याच्या व तिच्या वयाची पर्वा न करता कोणालाही आणि कुठेही होऊ शकते. भारताला असंसर्गजन्य रोगांच्या मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे आणि पक्षाघात हा त्यापैकी सर्वात सामान्य आजारांपैकी एक आहे. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि मधुमेह यांसारख्या इतर एनसीडीच्या बाबतीत जागरुकता नक्कीच आहे, परंतु स्ट्रोकच्या लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते आणि नंतर लोक स्वतःच अडचणीत येतात. स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी आणि स्क्रीनिंगसाठी जाणे अत्यावश्यक आहे.
हेही वाचा >>>>‘त्या’ तडजोडीचे दुष्परिणाम भोगले, बच्चू कडू यांचे विधान; आमदारांच्या गटबाजीवरुन प्रश्न विचारताच म्हणाले, “खोकेवाले आमदार…”
डॉ. डांगे पुढे सांगतात की, स्ट्रोकच्या रुग्णांचे निदान आणि उपचार करण्यासाठी वेळ मौल्यवान आहे. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्ट्रोक येतो तेव्हा ६० सेकंदात (म्हणजे १.९ दशलक्ष प्रति मिनिट) जवळजवळ ३२००० मेंदूच्या पेशी नष्ट होतात. त्यामुळे स्ट्रोक दरम्यान वेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणूनच एफएएसटीला खूप महत्त्व आहे. स्ट्रोकची लक्षणे एफएएसटी म्हणजेच फास्ट या संक्षेपानुसार लक्षात ठेवता येतील.
हेही वाचा >>>>गुजरात सरकार ‘समान नागरी कायदा’ लागू करण्याच्या तयारीत, घेतला महत्त्वाचा निर्णय
चेहऱ्याच्या एका बाजूला लकवा येणे. एक हात उंचावण्यास त्रास होणे. वाचा पूर्ण जाणे किंवा तोतरणे. वरीलपैकी कोणतेही लक्षण आढळल्यास वेळ महत्त्वाचा आहे, हे जाणून रुग्णाला शक्य तितक्या लवकर हॉस्पिटलमध्ये हलवले पाहिजे. याचा वापर करून तुम्ही स्ट्रोकची प्रारंभिक चिन्हे शोधू शकता. त्यामुळे, जर कोणाला यापैकी कोणतीही चिन्हे दिसली तर व्यक्तीला तत्काळ रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे. जेणेकरून गोल्डन हावरमध्ये उपचार करता येतील आणि कायमचे अपंगत्व येण्यापासून वाचवता येईल.
हेही वाचा >>>>‘नंबर दोनचे पप्पू’ म्हणत सत्तारांचे आदित्य ठाकरेंना थेट आव्हान, म्हणाले “दोन दिवसांत तुम्ही…”
बैठ्या जीवनशैलीमुळे हल्ली ४० ते ५५ वयोगटात स्ट्रोकचे प्रमाण वाढते आहे. मोठ्या संख्येने लोक रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित न करणे आणि स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका यांसारख्या घातक समस्यांना बळी पडतात. साथीच्या आजारादरम्यान योग्य काळजी न घेतल्याने देखील पक्षाघाताला आमंत्रण मिळू शकते. स्ट्रोकमुळे कायमचे अपंगत्व येऊ शकते किंवा मृत्यू देखील ओढावू शकतो. हात कमकुवतपणा, अस्पष्ट बोलणे, अंग अशक्तपणा, चक्कर येणे, डोके हलकेपणा, चालण्यात अडचण, चेहरा सून्न पडणे आणि शरीराच्या एका बाजूला अर्धांगवायू होणे ही काही धोक्याची चिन्हे आहेत. वेळीच निदान आणि आणि त्वरित उपचार स्ट्रोकशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात, अशी प्रतिक्रिया डॉ. चंद्रनाथ तिवारी, न्यूरोसर्जन, अपोलो स्पेक्ट्रा मुंबई यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>>>शिंदे गटात सामील होण्यासाठी किशोरी पेडणेकरांना मुख्यमंत्र्यांचा फोन? स्वत:चं दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या…
गोल्डन विंडो पीरियड म्हणजे, स्ट्रोकची लक्षणे जाणवल्याच्या पहिल्या काही तासांच्या आत (साडेचार तास ते कमाल २४ तासांपर्यंत) जर ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले तर दीर्घकालीन मेंदूची हानी टाळता येते. लक्षणे ओळखून वेळेवर आणि लवकर निदान केल्यास अनेकांचे जीव वाचू शकतात. ज्या रुग्णांना पक्षाघाताचा झटका आला आहे, त्यांनी दररोज व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे, वजन नियंत्रणात ठेवणे, मधुमेहावर लक्ष ठेवणे, वेळेवर औषधं घेणे आणि मिठाचे सेवन मर्यादित करणे, असेही डॉ. डांगे यांनी स्पष्ट केले.